Salman Society
Salman Society Saam Tv

Marathi Movie: 'सकाळी लवकर उठायचं'; मराठी चित्रपट सलमान सोसायटीचं नवं गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला

Marathi Movie: हा चित्रपट समाजातील अनाथ मुले आणि शिक्षणापासून वंचित मुलांच्या जीवनावर भाष्य करणारा आहे.
Published on

Salman Society New Song:

सध्या सोशल मीडिया सलमान सोसायटी चित्रपटाची चर्चा आहे. नुकतेच चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. चित्रपटाची गाणे लोकांच्या पसंतीत ही उतरले. आज चित्रपटाच नवीन गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे.(Latest News)

नुकत्याच आलेल्या ट्रेलरमध्ये इमोशन, ड्रामा आणि कॉमेडीची किनार पाहायला मिळाली होती. हा चित्रपट समाजातील अनाथ मुले आणि शिक्षणापासून वंचित मुलांच्या जीवनावर भाष्य करणारा आहे. ट्रेलरमध्ये शिक्षण घेण्यासाठी एका लहान मुलाची धडपड दिसत आहे. तीच धडपड आता नवीन गाण्यात दिसणार आहे. या गाण्याचे बोल आहेत, सकाळी लवकर उठायचं असून यात लहान मुलाची धडपड दिसत आहे. या चित्रपटात एक महत्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या देवकी भोंडवे यांनी गायले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भटक्या, अनाथ मुलांची व्यथा सर्वांना समोर यावी. या चित्रपटातून प्रबोधन होऊन मुलांना योग्य शिक्षण मिळावे या उद्देशाने दिग्दर्शक कैलाश पावर आणि निर्मात्यांनी प्रयत्न केलाय. अवंतिका दत्तात्रय पाटील प्रस्तुत सलमान सोसायटी' चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार यांनी केलाय. निर्मिती रेखा सुरेंद्र जगताप , शांताराम खंडू भोंडवे आणि वैशाली सुरेश चव्हाण प्राजक्ता एटंरप्राईजेसच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आलीय.

हा चित्रपट शिक्षणावर भाष्य करणारा असून हा चित्रपट १७ नोव्हेंबर २०२३ ला सर्व चित्रपटग्रहात प्रदर्शित होत आहे. भारत देश साक्षर होईल तेव्हा भारताचा विकास होईल या टॅगलाईनवर आधारीत आहे. चित्रपटाला संगीत श्रेयस आंगणे, मॅक्सवेल फर्नांडिस आणि मिलिंद मोरे यांनी दिले आहे. या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वाना प्रभावित करणारा गौरव मोरे एका वेगळ्या पण महत्वपूर्ण भूमिकेत दिसेल.

तसेच पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार ही बच्चे कंपनी मुख्य भूमिकेत असणार आहे. चित्रपटामध्ये उपेंद्र लिमये पाहुण्या भूमिकेत आहे. तसेच चित्रपटामध्ये देवकी भोंडवे, वनिता खरात, नम्रता संभेराव, कुणाल मेश्राम, शेषपाल गणवीर, नरेंद्र केरेकर, तेजस बने आदी कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

Salman Society
Diwali Aayo Re Song Released: दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ‘दिवाली आयो रे’ गाणं रिलीज, सोशल मीडियावर होतेय गाण्याची तुफान चर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com