बॉलीवूडच्या भाईजानला झालंय काय?भाईजानच्या नव्या लूकमुळे चाहत्यांना चिंता, सलमान आजारी की प्रमोशन फंडा?

Salman Khan Viral Sra Video Health Concerns: अभिनेता सलमान खानचा एसआरए कार्यालयातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओनंतर सलमानच्या चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जातेय. मात्र, आता सलमाननेच एक मिश्किल पोस्ट लिहत मौन सोडलंय. पाहूयात यावरचा एक रिपोर्ट...
Salman Khan during his visit to the SRA office in Mumbai, where his appearance sparked concern among fans online.
Salman Khan during his visit to the SRA office in Mumbai, where his appearance sparked concern among fans online.saam tv
Published On

रोहित कदम, साम टीव्ही

बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या लूकमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. काही दिवसांपूर्वीच अभिनेता सलमान खान वांद्रेस्थित झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरण अर्थात एसआरएच्या कार्यालयात दाखल झाला होता. यावेळी सलमान खानला पाहून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. सलमानचा चेहरा आणि थकलेले डोळे पाहून सोशल मीडियावरील फॅन्सनं चिंता व्यक्त केलीये. मात्र, सलमान खान अचानक एसआरएच्या कार्यालयात नेमका कशासाठी आला होता, ते पाहूयात...

अभिनेता सलमान खानने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या डेटा संकलन आणि पडताळणी सहाय्यता केंद्राच्या उद्धाटनाला उपस्थिती लावली. उद्धाटनावेळी सलमाननं लाभार्थ्यांना घराच्या चाव्या सुपूर्द केल्या. विशेष म्हणजे, सलमाननं उद्धाटन केलेल्या आधुनिक आयटी सर्व्हर रुम अंतर्गत प्राधिकरणाच्या ई-गव्हर्न्संसला नवी चालना मिळण्याची शक्यता आहे.

या चर्चेदरम्यान, सलमान खाननं इंस्टाग्रामवर स्वतःचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सलमान निवांत आणि आत्मविश्वासपूर्ण दिसत आहे. जरी त्याने थेट आपल्या तब्येतीबद्दल भाष्य केले नसले तरी, पोस्टसोबतच्या त्याच्या कॅप्शनने लोकांचे लक्ष वेधून घेतलंय. "तुम्ही सर्व कसे आहात?" अशी मिश्किल पोस्ट करत सलमाननंही आपल्या शैलीत उत्तर देत चाहत्यांच्या चिंतेवर पडदा टाकलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com