Salman Khan: 'भाऊंची भेळ...'; सलमान खानने रितेशसाठी बनवली खास भेळ, जेनिलियाने पोस्ट केलेला VIDEO व्हायरल

Salman Khan Making Bhel: सलमान खानचा पाणीपुरी आणि भेळ बनवतानाचा व्हिडिओ जेनिलिया देशमुखने सोशल मीडियावर शेअर केला आहे. रितेश देशमुखही व्हिडिओत दिसत असून हा व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
Salman Khan Making Bhel
Salman Khan Making BhelSaam Tv
Published On

Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान नेहमीच आपल्या साधेपणा आणि आपुलकीसाठी ओळखला जातो. २७ डिसेंबर रोजी सलमान खानने आपला वाढदिवस साजरा केला. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत त्याचा एक खास आणि वेगळाच अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला. अभिनेत्री जेनिलिया देशमुख हिने सलमान खानचा पाणीपुरी आणि भेळ बनवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये सलमान खान स्वतः हाताने पाणीपुरी आणि भेळ बनवताना दिसतो. विशेष म्हणजे या व्हिडिओत अभिनेता रितेश देशमुख देखील उपस्थित असून सलमानचा हा ‘होम शेफ’ अवतार पाहून तोही आनंदित झालेला दिसतो. मोठा सुपरस्टार असूनही सलमानने आपल्या मित्रांसाठी खास ‘भाऊंची भेळ’ बनवणं, हेच चाहत्यांच्या मनाला भिडत आहे.

Salman Khan Making Bhel
Elaichi Benefits: हिवाळ्यात दररोज दोन वेलची खल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

हा व्हिडिओ शेअर करताना जेनिलिया देशमुखने सलमानसाठी खास कॅप्शन लिहिलं आहे. तिने लिहिलं, @beingsalmankhan यांच्यासारखा दुसरा कोणी नाही, ते तुम्हाला आपलेसे वाटाव यासाठी खूप प्रयत्न करतात. यावेळी त्यांनी अगदी चविष्ट 'भाऊंची भेळ' खाऊ घातली. आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो!!!! यासोबतच तिने “सॉग से करेंगे सबका स्वागत” हे गाणं लावलं . जेनिलियाच्या या शब्दांतून सलमानच्या माणुसकीची आणि आपुलकीची झलक स्पष्टपणे दिसते.

Salman Khan Making Bhel
Jabrat: हिंदवी पाटील–सुरेखा कुडची यांची ठसकेबाज जुगलबंदी; 'जब्राट'मध्ये रंगणार लावणीचा फड

हा व्हिडिओ पोस्ट होताच सोशल मीडियावर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडू लागला आहे. "नमस्ते", "तुम्ही खूप भाग्यवान आहात", "सलमान भाईची कमाल, व्वा!" , ''या व्हिडिओसाठी धन्यवाद जेनिलिया''. अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. काहींनी सलमानच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे, तर काहींनी त्याच्या स्वभावाला सलाम ठोकला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com