Salman Khan: 'भाईजान'च्या जीवाला धोका? अज्ञात व्यक्तीने सुरक्षा ताफ्यात घुसण्याचा केला प्रयत्न; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Actor Salman Khan’s News: अभिनेता सलमान खानच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सलमान खानच्या ताफ्यात एका व्यक्तीने घुसण्याचा प्रयत्न केला आहे.
Entertainment News
Salman Khan NewsSaam Tv
Published On

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या चर्चेत आला आहे. सलमान खानच्या वडिलांना धमकी आली होती अशातच आता सलमान खानच्या ताफ्यात एका व्यक्तीने घुसण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता अभिनेता सलमान खानच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आज सकाळी सलमान खानचे (Salman Khan) वडील सलीम खान मॉर्निंग वॉकला गेले असताना एका महिलेने लॉरेन्स बिश्नोईच्या नावने त्यांना धमकावले. त्यानंतर आता सलमान खान वांद्रे येथील त्याच्या घरी जात असताना त्याच्या सुरक्षा ताफ्यात एक अज्ञात व्यक्तीने शिरण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे.

Entertainment News
Urfi Javed New Look: उर्फीच्या सौंदर्याचं होतंय तोंडभरून कौतुक; नेटकरी म्हणाले," स्वत: सुधारली, पण..."

मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान वांद्रे येथील त्याच्या घरी जात असताना गॅलेक्सी अपार्टमेंट येथे हा धक्कादायक प्रकार घडला. सलमानच्या ताफ्यात शिरलेल्या या अज्ञात व्यक्तीला पोलिसांना अटक केली आहे. या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक अज्ञात व्यक्ती मेहबूब स्टुडिओ ते गॅलेक्सी अपार्टंमेटदरम्यान सलमान खानच्या ताफ्यासोबत बाईकवरून जात होता. सुरक्षा रक्षकांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी संशयित व्यक्तीची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या दुचाकीस्वाराला गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पकडले आहे. उझैर मोहीउद्दीन असे या ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मोहीउद्दीनविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम  १२५ (इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणारे कृत्य) आणि २८१ (बेफिकीरपणे वाहन चालवणे) असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Entertainment News
Maharashtrachi Hasyajatra: हास्यजत्रेच्या टीमचा परदेश दौरा; थेट पॅरिसच्या एअरपोर्टवरच सुरू केली Rehearsal, व्हिडीओ पाहा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com