Bigg Boss 19: सलमान खानच्या शोमध्ये दिसणार 'हे' फेमस बॉलिवूड कपल; 'बिग बॉस १९'ची नविन अपडेट

Bigg Boss 19 Show: बिग बॉस १९'ची सतत नवीन अपडेट्स येत आहेत. इतकेच नाही तर या शोमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक नावे पुढे येत आहेत. अशा परिस्थितीत आता टीव्ही जगतातील आणखी एक मोठे नाव समोर आले आहे.
Bigg Boss 19
Bigg Boss 19Saam Tv
Published On

Bigg Boss 19 Show: सलमान खानच्या लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस १९' साठी तयारी सुरू झाली आहे. या नव्या सिझनमध्ये कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार याबद्दल उत्सुकता वाढली आहे. अलीकडेच, प्रसिद्ध टीव्ही अभिनेता राम कपूर आणि त्याची पत्नी गौतमी कपूर यांना 'बिग बॉस १९' मध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

राम कपूर आणि गौतमी कपूर हे दोघेही टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील ओळखले जाणारे प्रसिद्ध कपल आहेत. या जोडीने अनेक मालिकांमध्ये काम केले असून, त्यांच्या रिअल लाइफमधील केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडते. जर हे दोघे 'बिग बॉस १९' मध्ये सहभागी झाले, तर प्रेक्षकांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक पैलू पाहायला मिळू शकतात.

Bigg Boss 19
Janhvi Kapoor: अश्लील स्टेपसाठी माधुरीला पुरस्कार पण, श्रीदेवीकडे दुर्लक्ष; जान्हवी कपूरच्या लाईकमुळे नेटकरी गोंधळात

अद्यापपर्यंत राम कपूर आणि गौतमी कपूर यांनी 'बिग बॉस १९' मध्ये सहभागी होण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तसेच, शोच्या निर्मात्यांनीही त्यांच्या सहभागाची पुष्टी केलेली नाही. मात्र, त्यांच्या सहभागाची शक्यता असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Bigg Boss 19
Janhvi Kapoor: अश्लील स्टेपसाठी माधुरीला पुरस्कार पण, श्रीदेवीकडे दुर्लक्ष; जान्हवी कपूरच्या लाईकमुळे नेटकरी गोंधळात

यावर्षीच्या 'बिग बॉस १९' मध्ये निर्मात्यांनी यूट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सना सहभागी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी, टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. हा शो जुलै २०२५ मध्ये प्रसारित होण्याची शक्यता आहे. राम कपूर आणि गौतमी कपूर यांच्या सहभागामुळे 'बिग बॉस १९' मध्ये एक नवीन रंगत येऊ शकते. त्यांच्या जोडीच्या उपस्थितीमुळे शोला एक वेगळा आयाम मिळू शकतो, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com