बिग बॉसच्या (Bigg Boss 18) घरात रोज एक नवा ड्रामा पाहायला मिळत आहे. जसजसा बिग बॉसचा शेवटचा टप्पा जवळ येत आहे तसा सदस्यांचा गेम प्लान बदलत जात आहे. नुकताच बिग बॉसच्या घरात टाइम गॉडचा टास्क पार पडला. 'टाइम गॉड' च्या शर्यतीत अविनाश मिश्रा, रजत दलाल, चुम दरंग आणि श्रुतिका अर्जुन यांचा समावेश होता.
रजत दलालच्या मदतीने अविनाश मिश्रा 'टाइम गॉड' बनतो. जर अविनाशने रजतला मदत केली नसती तर चुम दरांग 'टाइम गॉड' बनली असती. ज्याच्या भांड्यात शेवटपर्यंत पाणी शिल्लक राहणार होते, तो सदस्य 'टाइम गॉड' बनवणार होते. घरातील सदस्य मिळून रजत दलालला टास्कमधून बाहेर काढले. शेवटी 'टाइम गॉड'चा टास्क अविनाश मिश्रा आणि चुम दरांग यांच्यात पार पडला. त्यात रजत दलाल अविनाशला पाठिंबा देतो.
बिग बॉसच्या घरात या आठवड्यात चाहत पांडे, दिग्विजय राठी, विवियन डिसेना , तीजेंदर बग्गा, करणवीर मेहरा आणि एडिन रोज हे सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता'वीकेंड का वार'ला बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाणार, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.