Salman Khan: बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान सध्या त्यांच्या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आला आहे. त्यांच्या नव्या लूकच्या फोटोनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला असून चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
अलीकडेच समोर आलेल्या फोटोंमध्ये सलमान खान पूर्वीपेक्षा अधिक फिट आणि स्लिम दिसत आहेत. रिपोर्टनुसार, त्याने त्याच्या आगामी चित्रपटासाठी तब्बल ७ ते ८ किलो वजन कमी केलं आहे. नयनतारा सोबतच्या प्रोजेक्टसाठी त्याने हा खास फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन केला असल्याचं सांगितलं जात आहे.
या व्हायरल फोटोंमध्ये सलमान साध्या टी-शर्ट आणि जीन्समध्ये दिसत आहेत, पण त्यांचा बदललेला चेहरा आणि फिट बॉडी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे, एका दिव्यांग चाहत्यासोबत त्यांनी फोटो काढला असून त्यातून त्यांचा साधेपणा देखील दिसून येतो. हा फोटो पोस्ट करताना चाहत्याने लिहिले, #SVC63 साठी सलमान खानने ७-८ किलो वजन कमी केले आहे आणि तो अत्यंत देखणा दिसत आहे!
सलमानचा आगामी चित्रपट
सलमान खान बॅटल ऑफ गलवानवर आधारित मातृभूमी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत व्यतिरिक्त चित्रांगदा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रांगदा पहिल्यांदाच सलमान खानसोबत काम करणार आहे. तसेच सलमान खान लवकरच दिग्दर्शक वामशी पैडिपल्ली यांच्या आगामी चित्रपटात सलमान खान नयनतारासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या प्रकल्पाचा सध्या #SVC63 असा उल्लेख केला जात आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात एप्रिल महिन्यात एका पारंपरिक 'मुहूर्त' समारंभाने झाली. हा चित्रपट ॲक्शन-ड्रामा चित्रपट असून, तो २०२७ मध्ये चित्रपटगृहांत प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.