Salim khan Health Update: सलमान खानचे वडील सलीम खान व्हेंटीलेटरवर; डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट

Salim khan Health Update: सलमान खानचे वडील सलीम खान यांना ब्रेन हॅमरेज झाल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची हेल्थ अपडेट दिली आहे.
Salim khan Health Update
Salim khan Health UpdateSaam Tv
Published On

Salim khan Health Update: बॉलिवूडचे दिग्गज पटकथालेखक आणि अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना अचानक तब्येत बिघडल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता डॉक्टरांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांना ब्रेन हॅमरेज (डोक्यात रक्ताचा गाठ) झाला, यामुळे तातडीने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

मंगळवारी सकाळी सलीम खान यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने मुंबईतील लीलावती रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) हलवले. तेव्हापासून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवत आहेत. या हॅमरेजमुळे त्यांच्या रक्तदाबात तात्पुरता वाढ झाला आणि त्यांना आवश्यक उपचार देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली.

Salim khan Health Update
Siddharth Malhotra: 'तुम्ही नेहमीच माझ्यासोबत...'; वडिलांच्या निधनानंतर सिद्धार्थ मल्होत्राची पहिली भावनिक पोस्ट

लीलावती रुग्णालयातील डॉक्टर डॉ. जलील पारकर यांनी आज दिलेल्या हेल्थ अपडेटमध्ये सांगितले की सलीम खान यांना मोठ्या प्रकारची शस्त्रक्रिया करणे आवश्यक नव्हते. त्याऐवजी, Digital Subtraction Angiography (DSA) नावाचे एक साधे वैद्यकीय प्रोसीजर आज सकाळी यशस्वीपणे करण्यात आले. यामुळे ब्रेन हॅमरेजचा प्रभाव कमी करण्यास मदत झाली आणि सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहेत. डॉ. पारकर यांच्या म्हणण्यानुसार, हे प्रोसीजर केवळ सुरक्षिततेच्या दृष्टीने केले गेले आणि त्याचे परिणाम चांगले आहेत.

Salim khan Health Update
Actress Scandal: अभिनेत्रीचा स्टेडियमच्या लेडीज टॉयलेटमध्ये लपून बनवला अश्लील व्हिडिओ; ब्लॅकमेल करुन केली पैशांची मागणी

सध्या सलीम खान यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे, त्यांची प्रकृती अजून बिघडू नये म्हणून त्यांना व्हेंटीलेटर ठेवण्यात आले आहे. त्यांना उद्या किंवा परवा पर्यंत व्हेंटीलटरवरुन आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात येईल. सलीम खान हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रतिष्ठित नाव आहे. त्यांनी अनेक सुविख्यात चित्रपटांसाठी पटकथा लिहिली असून, त्यांच्या योगदानामुळे त्यांना सिनेसृष्टीत मोठे सन्मान प्राप्त झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com