Sakhe Ga Sajani Trailer: मराठी चित्रपटसृष्टीत प्रवास किंवा मित्रांवर आधारित अनेक चित्रपट येत आहेत. आता तीन मित्रांच्या प्रवासाची कहाणी सांगणार 'सखे गं साजणी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे मैत्री आणि प्रवासाची नवी कहाणी मांडणाऱ्या ‘सखे गं साजणी’ या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाढली असून, हा चित्रपट एक वेगळा आणि ताजातवाना अनुभव देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रार्थना बेहरे, पूजा सावंत आणि अभिजीत खांडकेकर हे त्रिकुट हा चित्रपट घेऊन आले आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तीन मित्रांच्या प्रवासाची कहाणी उलगडताना दिसते. या प्रवासात त्यांच्या आयुष्यातील विविध टप्पे, नात्यांमधील चढ-उतार आणि भावनिक क्षणांची सुंदर मांडणी करण्यात आली आहे. मैत्रीतील घट्ट बंध, साहसपूर्ण क्षण आणि जीवनातील साध्या पण महत्त्वाच्या गोष्टी यांचा सुरेख मिलाफ ट्रेलरमधून अनुभवायला मिळतो. त्यामुळे हा चित्रपट केवळ मनोरंजन न करता प्रेक्षकांच्या मनालाही भिडणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
याआधीच चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शित झाली असून, त्यांनाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ‘सखे गं साजणी’ हे शीर्षक गीत विशेष गाजत असून, त्याने मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. हे गाणे अभिजीत सावंत यांनी गायले असून, संगीत विजय भाटे यांनी दिले आहे. गीतकार लखन चौधरी यांच्या शब्दांनी गाण्याला भावनिक आणि उत्साही रंग दिला आहे.
तसेच ‘डीजे चा बास’ हे आणखी एक गाणेही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणे करण सावंत आणि श्वेता ठाकूर यांनी गायले असून, त्याचे संगीतही विजय भाटे यांनीच दिले आहे. या गाण्याचे बोलही लखन चौधरी यांनीच लिहिले आहेत. दोन्ही गाण्यांमधून चित्रपटातील मैत्री, उत्साह आणि प्रवासाचा जल्लोष स्पष्टपणे जाणवतो.
‘सखे गं साजणी’ हा चित्रपट मैत्री, प्रवास आणि आयुष्यातील खास क्षणांची गोष्ट मांडणारा आहे. हलक्या-फुलक्या क्षणांसोबतच भावनिक पैलूही यात प्रभावीपणे सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना एक आनंददायी, ताजातवाना आणि हृदयस्पर्शी अनुभव देण्यासाठी सज्ज झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.