Sahil Khan : बॉलिवूड अभिनेत्याने दुबईतील बुर्ज खलिफा येथे केलं दुसरं लग्न, २६ वर्षांनी लहान साहिलची बायको नक्की आहे कोण?

Sahil Khan Wedding: बॉलिवूड अभिनेता साहिल खानने व्हॅलेंटाईन डेच्या खास प्रसंगी गर्लफ्रेंड मिलेना अलेक्झांड्राशी लग्न केले. दुबईतील प्रसिद्ध इमारती बुर्ज खलिफा येथे या जोडप्याने लग्न केले.
Sahil Khan Wedding
Sahil Khan WeddingSaam Tv
Published On

Sahil Khan Wedding: 'स्टाईल' आणि 'एक्सक्यूज मी' सारख्या हिट बॉलिवूड चित्रपटांमुळे प्रसिद्ध झालेल्या अभिनेता साहिल खानने त्याची प्रेयसी मिलेना अलेक्झांड्राशी लग्न केले आहे. हे लग्न दुबईच्या प्रसिद्ध इमारती बुर्ज खलिफा येथे झाले, जिथे दोघांनी एकमेकांचे हात धरून नवीन आयुष्याची सुरूवात केली.

साहिल खानने सोशल मिडीयावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. पोस्टला कॅप्शन देत साहिल खानने लिहिले, "शेवटी लग्न झाले... शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा. तुम्हा सर्वांना प्रेम, आनंद आणि यश मिळावे अशी प्रार्थना."

Sahil Khan Wedding
Chum Darang and Karanveer Mehra: जोडी जमली... बिग बॉस फेम चुम दरंग समोर करणवीर मेहराने दिली प्रेमाची कबुली, व्हिडीओ व्हायरल

रॉयल लूक

लग्नाच्या या खास प्रसंगी साहिल खान आणि त्याची नवी वधू मिलेना यांनी रॉयल लूक केला होता. पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये दिसून येते की मिलेना पांढऱ्या रंगाचा गाऊन घालून खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या गाऊनवरील उत्तम भरतकाम तिला एक रॉयल लूक देत आहे. त्याच वेळी, साहिल खान काळ्या सूटमध्ये डॅशिंग लूकमध्ये दिसला.

Sahil Khan Wedding
Prateik babbar Wedding: स्मिता पाटीलचा मुलगा दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर; पण लग्नाला बब्बर कुटुंबाला निमंत्रणच नाही, कारण काय?

साहिलची बायको २६ वर्षांनी लहान आहे.

साहिल खान आणि मिलेना यांच्या वयात २६ वर्षांचा फरक आहे. साहिल ४८ वर्षांचा आहे, तर मिलिना फक्त २२ वर्षांची आहे. साहिल खानने 'स्टाईल' आणि 'एक्सक्यूज मी' सारख्या हिट चित्रपटांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. ती बेलारूस (युरोप) ची रहिवाशी आहे. साहिलने खुलासा केला की मिलेना एक विद्यार्थी होती आणि तिने तिचे शिक्षण त्यांच्या रिलेशनशिप दरम्यान पूर्ण केले होते.

दरम्यान, साहिल आता अभिनयापासून दूर राहून तो फिटनेस इंडस्ट्रीमधील एक मोठा उद्योगपती बनला आहे. या जोडप्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्याचबरोबर त्याचे चाहते त्याचे अभिनंदन करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com