
Sachit Patil: सध्या मराठी सिनेसृष्टीत एकाच चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे, तो म्हणजे ‘असंभव’. या चित्रपटाचं शुटिंग नैनीतालमध्ये सुरु आहे. नैनीतालच्या ० ° आणि -३° सेल्सियस सारख्या गोठवणाऱ्या थंडीच्या वातावरणात मुक्ता बर्वे, प्रिया बापट, संदीप कुलकर्णी आणि पुष्कर श्रोत्री या सिनेमाचं शुटिंग करीत आहेत.या चित्रपटाबद्दल आणखी एक खास बाब समोर आली आहे, ती म्हणजे मल्टी टॅलेंटेड अभिनेता सचित पाटिल ‘साडे माडे तीन’ आणि ‘क्षणभर विश्रांती’ चित्रपटांनंतर आता ‘असंभव’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. यासोबत सचितनेच या सिनेमाची पटकथा देखील लिहिली आहे. एवढंच नाही तर या चित्रपटाच्या निमित्ताने सचित पाटिल निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करतोय.
या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सचित पाटिलसोबत त्यांचा जिवलग मित्र पुष्कर श्रोत्री या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळतोय. सिनेमाबद्दल अभिनेता पुष्कर श्रोत्री अतिशय उत्साही आहेत, याबद्दल बोलताना तो म्हणाला, “जेव्हा या चित्रपटाची गोष्ट कपिल भोपटकर आणि सचित पाटील यांनी मला ऐकवली तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने माझ्या लक्षात आली की चित्रपटाची कथा सचितच्या अंगात पूर्णपणे भिनली आहे.
सचित हा माझा अनेक वर्षांपासूनचा जीवलग मित्र आणि माझ्या कुटुंबाचा एक भाग असल्यामुळे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असताना आमच्यातल्या मैत्रीचा आणि आम्हा दोघांच्या चित्रपट विषयक कलात्मक विचारांचा एकत्रित असा फायदाच "असंभव"साठी करून घ्यायचा, हे आम्ही ठरवलं. आणि नैनिताल मधलं चित्रीकरण करत असताना चित्रपटासाठी आम्ही दोघांनी त्याचा पुरेपूर वापर करून घेतला.
‘असंभव’ या चित्रपटामुळे नितीन प्रकाश वैद्य - सचित पाटील यांची मुंबई-पुणे फिल्म एंटरटेनमेंट आणि शर्मिष्ठा राऊत - तेजस देसाई यांची एरिकॉन टेलिफिल्मस या दोन्ही निर्मिती संस्था पहिल्यांदाच एकत्र आल्या आहेत. ‘वळू’, ‘नाळ’, ‘एकदा काय झालं ’, ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ ते ‘लाईक आणि सबस्क्राईब’ अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांच्या निर्मितीचा अनुभव गाठीशी असलेल्या नितीन प्रकाश वैद्य यांची भक्कम साथ या चित्रपटाला लाभली असून हा चित्रपट १ मे २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.