Deepika Padukone: दीपिका नाही, तर 'ही' अभिनेत्री होती 'पद्मावत'साठी संजय लीला भन्साळींची पहिली पसंती

Deepika Padukone: २०१८ मध्ये संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत हा चित्रपट लोकांना खूप आवडला. या चित्रपटात दीपिकाने राणी पद्मिनीची भूमिका साकारली होती.
deepika padukone
deepika padukoneGoogle
Published On

Deepika Padukone: बॉलिवूडमध्ये संजय लीला भन्साळी हे असे निर्माते आहेत जे अनेकदा कोणत्या ना कोणत्या ऐतिहासिक विषयावर चित्रपट बनवतात. त्यांच्या चित्रपटांची खूप चर्चा होते. त्यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणजे 'पद्मावत', जो २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहिद कपूर, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट अनेकांना आवडला, तर काही लोकांनी त्यावरुन वादही निर्माण केला.

या चित्रपटात दीपिका पदुकोण चित्तोडची राजपूत राणी पद्मिनीची भूमिका साकारली हेती, जी रावल रतन सिंग यांची पत्नी आहे, रावल रतन सिंग यांची भूमिका शाहिद कपूरने साकारली आहे. 'पद्मावत' चित्रपटात दीपिकाचे खूप कौतुक झाले. दरम्यान खूप कमी लोकांना माहिती आहे की संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटात राणी पद्मिनीची भूमिका कंगना राणौतला ऑफर केली होती. गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर कंगनाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने हा खुलासा केला आहे.

deepika padukone
Ajintha Verul Film Festival : 'टीकेला प्रतिउत्तर देण्यापेक्षा...'; अभिनेत्री सीमा बिस्वास यांनी उलगडला जीवनप्रवास

कंगनाने विचारले भूमिका काय आहे?

कंगना सध्या तिच्या 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या दरम्यान तिने एका मुलाखतीत 'पद्मावत' बद्दल बोलले होते. तिने सांगितले होते की संजय लीला भन्साळी यांनी तिला या चित्रपटाची ऑफर दिली होती, परंतु जेव्हा तिने चित्रपटाची पटकथा विचारली तेव्हा चित्रपट भन्साळींनी सांगितले की तो ही पटकथा कोणालाही सांगू शकत ​​नाही. त्यानंतर, जेव्हा अभिनेत्रीला चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल विचारण्यात आले तेव्हा संजय लीला भन्साळी म्हणाले की, नायक पहिल्यांदाच आरशात नायिकेला पाहतो आणि ती तयार होत आहे.

deepika padukone
Kareena Kapoor Statement: 'तो सैफवर सपासप वार करत होता आणि मी...' करीनानं पोलिसांना सगळं काही सांगितलं

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पाहिला

दरम्यान, नंतर दीपिकाची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. चित्रपटाबद्दल बोलताना कंगना म्हणाली की जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मी तो पाहिला. चित्रपट निर्माते खरे सांगत होते की संपूर्ण चित्रपटात नायिका प्रत्यक्षात तयारी करत होती. जर आपण कंगनाच्या सध्याच्या चित्रपटाबद्दल बोललो तर तिचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे, जो प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेक वादातून गेला आहे. मात्र, अजूनही अनेक ठिकाणी या चित्रपटाला विरोध होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com