Rubina Dilaik Confirms Pregnancy: रुबिना दिलैक होणार आई; पती अभिनवसोबतचा फोटो शेअर करत दिली ‘गुड न्यूज’...

Rubina Dilaik News: रुबिना दिलैकने सोशल मीडियावर पती अभिनवसोबत फोटो शेअर करत, अभिनेत्रीने चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे.
Rubina Dilaik and Abhinav Shukla have Confirms Pregnancy News
Rubina Dilaik and Abhinav Shukla have Confirms Pregnancy NewsInstagram
Published On

Rubina Dilaik and Abhinav Shukla have Confirms Pregnancy News

अभिनेत्री रुबिना दिलैक आणि पती अभिनव शुक्ल काही दिवसांपूर्वी एका मॅटर्निटी क्लिनीकबाहेर स्पॉट झाले होते. तेव्हापासून रुबिना गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. नुकतंच सोशल मीडियावर पती अभिनवसोबत फोटो शेअर करत, चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे. रुबिनाने पतीसोबत फोटो शेअर करत, चिमुकल्याच्या आगमनासाठी उत्सुक असल्याचे सांगितले.

Rubina Dilaik and Abhinav Shukla have Confirms Pregnancy News
Baramati News: 'माझ्या कार्यक्रमाला कायमच टार्गेट केलं जातं', असं का म्हणाली गौतमी पाटील?

अभिनेत्री रुबिनाने फोटो शेअर करताना सांगितले की,“ आम्ही ज्यावेळी एकमेकांना डेट करत होतो, त्यावेळीच एकमेकांना वचन दिले होते की, आपण एकत्रित जग एक्स्प्लोअर करु. गेल्या काही वर्षांपूर्वी आम्ही लग्न केलं, आता लवकरच आमचं एक छोटं कुटुंब तयार होणार आहे. चिमुकल्याचे स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत.” शेअर केलेल्या फोटोमध्ये रुबिना आणि पती अभिनव एका यॉटवर उभे असलेले दिसून येत आहे.

Rubina Dilaik and Abhinav Shukla have Confirms Pregnancy News
Bharati Singh Fell Off The Bed: मोबाइल पाहण्यात इतकी गुंतली की थेट बेडवरूनच पडली; प्रसिद्ध अभिनेत्रीला दुखापत

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये रुबिनाने ब्लॅक टिशर्ट आणि ट्राऊजर परिधान केलेली दिसून येत आहे. सोबतच त्यावर राखाडी रंगाचं जॅकेट तिने परिधान केले आहे, तर अभिनवने व्हाईट रंगाची हुडी आणि ब्ल्यू जिन्स परिधान केली आहे. अभिनेत्रीने फोटो शेअर करताच चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटी मित्रांनी तिच्या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

जून २०१८ मध्ये रुबिना आणि अभिनव लग्नबंधनात अडकले होते. या क्यूट कपलच्या लग्नाला पाच वर्ष झाले असून लवकरच रुबिना एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे. रुबिना 'छोटी बहू' या मालिकेतून प्रसिद्धी झोतात आली होती. तर ती आता पंजाबी चित्रपटातून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'चाल भज चलिए' असे या चित्रपटाचे नाव आहे. रुबिना बिग बॉस १४ची विजेती आहे. (Latest Entertainment News)

Rubina Dilaik and Abhinav Shukla have Confirms Pregnancy News
IAS Tina Dabi: IAS अधिकारी टीना डाबी झाल्या आई; जयपूरच्या रुग्णालयात दिला गोंडस बाळाला जन्म

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com