IAS Tina Dabi: IAS अधिकारी टीना डाबी झाल्या आई; जयपूरच्या रुग्णालयात दिला गोंडस बाळाला जन्म

Tina Dabi Become Mother: जैसलमेरच्या आयएएस ऑफिसर टीना डाबी यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.
IAS Officer Tina Dabi Became A Mother
IAS Officer Tina Dabi Became A MotherSaam Tv

IAS Officer Tina Dabi Became A Mother

सोशल मीडियावर जैसलमेरच्या आयएएस ऑफिसर टीना डाबी यांची कायमच चर्चा होत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी त्या आई होणार याची चर्चा देखील झाली होती. अखेर त्यांनी आज जयपूर येथील एका रुग्णालयात एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. टीना डाबी यांनी एका बाळाला जन्म दिल्यामुळे टीना यांच्या घरी आणि पती प्रदीप गावंडेंच्या घरी आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

IAS Officer Tina Dabi Became A Mother
Rahul Navin New ED Director: राहुल नवीन ED चे कार्यकारी संचालक, जाणून घ्या कशी आहे त्यांची कारकीर्द

२०१५ च्या बॅचमधील टॉपर अधिकाऱ्यांपैकी एक त्या अधिकारी आहेत. जुलै २०२२ मध्ये टीना यांची जैसलमेरच्या जिल्हाधिकारी म्हणून निवड करण्यात आली होती. प्रेग्नेंट असल्याची गुड न्यूज दिल्यापासून त्या मॅटर्निटी लिव्हवर होत्या. प्रेग्नन्सीमुळे टीना डाबी यांनी राज्य सरकारकडे जयपूरमध्ये नॉन फील्ड पोस्टिंग देण्याबाबतची मागणी केली होती. त्यानंतर टीना मॅटर्निटी लीव्हवर गेल्या होत्या. (Bollywood)

२०१५ चे आयएएस ऑफिसर टॉपर राजस्थान केडर ऑफिसर टीना डाबीने २०२२ मध्ये IAS अधिकारी प्रदीप गावंडे यांच्यासोबत लग्न केले. प्रदीप गावंडे हे टीना डाबीपेक्षा १३ वर्षांनी मोठे आहेत. टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांनी २२ एप्रिल २०२२ रोजी लग्नगाठ बांधली होती. (Entertainment News)

IAS Officer Tina Dabi Became A Mother
Deepika Padukone On Jawan: शाहरूख खानसाठी काय पण! दीपिका पदुकोणचा 'जवान'साठी मोठा त्याग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com