RRR: एसएस राजामौली दिग्दर्शित 'RRR' चित्रपट गेल्या वर्षी सिनेमागृहात प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. गेल्या वर्षी 'RRR'ने एक-दोन नाही तर अनेक पुरस्कार पटकावले आहेत. नुकत्याच झालेल्या 80 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटात साऊथमधील ज्युनियर एनटीआर आणि रामचरण हे दोन सुपरस्टार आहेत. सध्या चित्रपटातील या दोघांचाही लूक चांगलाच चर्चेत राहिला आहे. जाणून घेऊया गाण्यातील लूकबद्दल.
'नाटू नाटू' या गाण्यावर ज्युनियर एनटीआर आणि रामचरण या दोघांनीही जबरदस्त डान्स केला आहे. गाण्यातील हूक स्टेप्स जितके चाहत्यांना आवडला तितकाच त्यांच्या ड्रेसचीही चर्चा होत आहे. खरं तर, या गाण्यात, दोन्ही सुपरस्टार त्यांच्या ट्राउझर्समध्ये हटक्या स्टेप्स करत थिरकले आहेत. सध्या यांची सर्वत्रच चर्चा होत आहे. या गाण्यात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी परिधान केलेल्या ड्रेसचा खूप जुना इतिहास आहे.
पण, ज्या काळात हा चित्रपट बनला आहे, त्या काळात ससपेंडर घालून डान्स करण्याला विरोध दर्शवला जायचा. अनेक काळ त्या ड्रेसला आणि ससपेंडरला विरोध होत होता. पण नंतर कालांतराने चामड्याचा पट्टा आल्याने ससपेंडरला विरोध करणे बंद झाले.
यानंतर 1800 च्या दशकाच्या सुरुवातीला ही ट्राऊजर पॅंट पुन्हा एकदा चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा या चित्रपटाच्या निमित्ताने का होईना ही पँट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.