OTT Release: बॉक्स ऑफिसवर फ्लॉप पण ओटीटीवर धुमशान, 'ही' देखील वेबसीरीज तुफान चालते...

२०२२ हे वर्ष जरी त्याला निराशाजनक गेलं असलं तरी अक्षय सोबतच बॉलिवूडसाठी एक आनंदाची बातमी आहे.
ott platform
ott platformSaam Tv
Published On

OTT Release: २०२२ हे वर्ष बॉलिवूडने नाही तर दाक्षिणात्य चित्रपटांनी जबरदस्त गाजवले. एकूण एक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर यशस्वी कामगिरी करत आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. बॉलिवूडमधील मोजकेच चित्रपट आपली जादू बॉक्स ऑफिसवर दाखवू शकले.

या वर्षात अक्षय कुमारचे सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. २०२२ हे वर्ष जरी त्याला निराशाजनक गेलं असलं तरी अक्षयसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण त्याचा ‘कठपुतली’ हा चित्रपट गेल्या वर्षी ओटीटीवर सर्वाधिक पाहिला गेलेला हिंदी चित्रपट ठरला आहे.

ott platform
RRR Movie: ज्युनियर एनटीआरचे चित्रपटाबद्दल मोठे वक्तव्य, 'चित्रपटाला भारतापेक्षा जपानने दिले सर्वाधिक प्रेम'

‘ओरमॅक्स’ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, अजय देवगणची ‘रुद्र द एज ऑफ डार्कनेस’ ही वेबसीरिज आणि ‘कठपुतली’ हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांनी सर्वाधिक पाहिला होता. चित्रपटांच्या बाबतीत ‘कठपुतली’नंतर यामी गौतमी अभिनित ‘द थर्सडे’ चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

ott platform
Randeep Hooda Get Injured: रणदीप हुड्डाला घोडेस्वारी करताना गंभीर दुखापत, अपघातानंतर उपचाराकरिता रुग्णालायात दाखल

तर, विकी कौशलचा ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर राहिला. या यादीत दीपिका पादुकोणच्या ‘गहराइयां’ चित्रपटाचाही समावेश अजूनही कायम आहे. हा चौथ्या क्रमांकावर असून कार्तिक आर्यनचा ‘फ्रेडी’ चित्रपट पाचव्या क्रमांकावर आहे.

ott platform
Aadipurush: सीतेच्या कपड्यांचा वाद, प्रभासच्या 'आदिपुरुष'मुळे सेन्सॉर बोर्डही अडचणीत, नेमकं काय घडलं?

जरी ही या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात असफल ठरले असतील तरी ही, ओटीटीवर या चित्रपटांनी आपली जादू दाखवली. ओटीटी २०२० पासून बराच चर्चेत आहे. ओटीटीवर प्रेक्षक चित्रपट आणि वेबसीरिज आवर्जून पाहतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com