Rohit Arya Case: रोहित आर्यप्रकरणात 'या' प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा; थेट कार्यशाळेतील फोटो टाकले, अन् म्हणाला...

Marathi Actor On Rohit Arya Case: मुंबईच्या पवई भागात नुकतेच घडलेले रोहित आर्य प्रकरण अजूनही चर्चेत आहे. या घटनेने मराठी मनोरंजन क्षेत्राला हादरवून सोडले आहे.
rohit arya case marathi actor aayush sanjeev
rohit arya case marathi actor aayush sanjeev
Published On

Marathi Actor On Rohit Arya Case: मुंबईच्या पवई भागात नुकतेच घडलेले रोहित आर्य प्रकरण अजूनही चर्चेत आहे. या घटनेने मराठी मनोरंजन क्षेत्राला हादरवून सोडले आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री रुचिता जाधव नंतर आता अभिनेता आयुष संजीव याने देखील सोशल मीडियावर एक धक्कादायक पोस्ट शेअर केली आहे.

आयुष संजीवने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, “घटना घडण्याच्या दोन दिवस आधीच मी रोहित आर्यला भेटलो होतो. आम्ही त्यावेळी कामाबद्दल चर्चा केली होती. त्याने मला ‘लेट्स चेंज ४’ नावाच्या एका चित्रपटात कामाची ऑफर दिली होती.” आयुषने पुढे लिहिले, “त्या दिवशी त्याने सांगितलेली कथा आणि आता जे काही घडलं आहे, त्यात साम्य आहे. मी हे सगळं समजल्यानंतर पूर्णपणे हादरलो आहे.”

rohit arya case marathi actor aayush sanjeev
The Taj Story: ताजमहाल मंदिराच्या जागी बांधलाय? परेश रावल यांच्या चित्रपटातील कथा कल्पनिक की सत्य!

अभिनेता पुढे म्हणतो, “मी रोहितला जवळपास ८-९ वर्षांपूर्वी भेटलो होतो. तेव्हा तो अगदी सामान्य, साधा आणि सुसंस्कृत वाटला होता. पण आता जे काही झालं, त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. मी त्या कार्यशाळेतही गेलो होतो. मी त्या कार्यशाळेतील मुलांना भेटलो आणि त्यांच्याबरोबर फोटोही काढला होता. तेव्हा सर्व काही नॉर्मल वाटत होतं. नशिबानं ती सगळी मुलं सुरक्षित आहेत.”” आयुषच्या या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये आणि सहकलाकारांमध्ये चर्चेचं वातावरण निर्माण झालं आहे.

rohit arya case marathi actor aayush sanjeev
Dharmendra health update: धर्मेंद्र यांची प्रकृती आणखी खालावली; ICU मध्ये दाखल, डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट
rohit arya case marathi actor aayush sanjeev
rohit arya case marathi actor aayush sanjeev

पवईमधील या प्रकरणात रोहित आर्यने १७ मुलांना चित्रपटात काम देतो असे आमिश दाखवून ओलीस ठेवून पोलिसांशी सामना केला होता. अनेक तास चाललेल्या या नाट्यमय घडामोडीनंतर पोलिस कारवाईदरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर आर्यच्या कामकाजाचा आणि त्याच्याशी संपर्कात असलेल्या लोकांचा तपास सुरू आहे.

आयुष संजीव यांची ही पोस्ट आता पोलिसांच्या चौकशीसाठी एक महत्त्वाचा धागा ठरू शकते, कारण त्यांनी रोहितशी नुकतीच भेट घेतल्याचं स्पष्ट केलं आहे.या घटनेनंतर मराठी कलाविश्वात प्रचंड खळबळ माजली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया देत ‘कामाच्या निमित्ताने भेटताना अधिक सावधगिरी बाळगावी’ असा सल्ला दिला आहे. या घटनेमुळे मराठी मनोरंजन क्षेत्रात भीती, गोंधळ आणि जागरूकतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com