Visfot WebSeries Trailer : नात्यांच्या चक्रव्यूहात अडकलेला 'विस्फोट'

Faradin Khan's comeback : फरदीन, रितेश आणि प्रियाची मुख्य भूमिका असलेल्या वेबसिरीजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला.
VISFOT
VISFOTVisfot Web Series Trailer Out
Published On

Upcoming Hindi Web Series : 'रॉक, पेपर, सिजर्स' या आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा रिमेक असलेल्या हिंदी थ्रिलर 'विस्फोट' या वेबसिरीजचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. येत्या ६ सप्टेंबरला हा चित्रपट जिओ सिनेमावर प्रदर्शित होईल.

या वेबसिरीजच्या निमित्ताने प्रिया बापट व रितेश देशमुख ही जोडी प्रेक्षकांना पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे. या वेबसिरीजचं दिग्दर्शन कूकी गुलाटी यांनी केलं असून 'हे बेबी' सिनेमानंतर रितेश देशमुख व फरदीन खान यांची जोडी 'विस्फोट'च्या निमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे.

सध्या 'बिग बॉस मराठी'मुळे अभिनेता रितेश देशमुख चर्चेत आहे. या पर्वाचं तो होस्टिंग करत आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश सदस्यांची शाळा घेताना दिसतो. त्याचं सर्वत्र कौतुकही होत आहे. आता रितेश नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'विस्फोट' या नव्या वेब सीरिजमधून रितेश प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

रितेश आणि प्रियाची केमिस्ट्री या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळत आहे. रितेशची पत्नी दाखवलेल्या प्रियाचं अफेअर असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे. त्यानंतर रितेश आणि प्रियाच्या मुलाला किडनॅप केल्याचं पाहायला मिळत आहे.

एका जॅकेटमुळे फरदीनचं आयुष्यही उध्वस्त झाल्याचं दिसत आहे. नात्यांच्या चक्रव्यूहात अडकलेला रितेश आपल्या मुलाला सुखरूप वाचवू शकेल का? हे पाहणं रंजनकारक असणार आहे.

रितेश देशमुखचा या वेब सीरिजमध्ये वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. 'विस्फोट' वेब सीरिजमध्ये रितेश एका पायलटची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सीरिजच्या निमित्ताने पहिल्यांदाच रितेश आणि प्रिया बापट एकत्र काम करणार आहेत.

'विस्फोट'च्या ट्रेलरमध्ये प्रियाच्या बोल्ड अंदाजाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही सीरिज ६ सप्टेंबरला जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com