
ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा चॅप्टर 1’चा ट्रेलर रिलीज झाला.
चित्रपटाचा ट्रेलर रिलीज फक्त १० दिवस आधी करण्यात आलाय.
‘कांतारा चॅप्टर 1’ हा पहिल्या भागाचा प्रीक्वेल आहे.
मागील वर्षी ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा' सिनेमानं भारतीय चित्रपटसृष्टीत अभूतपूर्व यश मिळवलं होतं. आता या कांतारा'चा प्रीक्वेल भाग प्रदर्शित होणार आहे. या 'कांतारा चॅप्टर 1'चा ट्रेलर रिलीज झालाय. अवघे १० दिवस शिल्लक असताना सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. या सिनेमाचा पहिला भाग खूप गाजला होता, त्यानंतर याचा नवी भाग आता प्रदर्शनासाठी सज्ज झालाय.
'कांतारा चॅप्टर 1'ची रिलीज डेट सुरुवातीला 2 ऑक्टोबर 2025 ही निश्चित करण्यात आली आहे. साधरण पाहिलं तर अनेक निर्माते त्यांच्या सिनेमाची मार्केटिंग तब्बल 21 ते 30 दिवसआधी सुरू करत असतात. पण 'कांतारा चॅप्टर 1' हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याच्या १० दिवस आधी ट्रेलर रिलीज करण्यात आलाय.
'कांतारा चॅप्टर 1' चा ट्रेलर हा पहिला सिनेमा जेथे संपलाय तेथून सुरू होतो. ट्रेलरमध्ये कांताराच्या पौराणिक इतिहास दाखवण्यात आलाय. दरम्यान निर्मात्यांनी ट्रेलरमध्ये सस्पेंस ठेवलाय. त्यामुळे गूढ, रहस्यमय इतिहास या आहे, हे पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करतील यात शंका नाही. या चित्रपटात ऋषभ शेट्टीची भूमिका नेमकी काय असणार? याबाबत कोणतीच माहिती समोर आली नाहीये.
दरम्यान हा चित्रपट बनवण्यासाठी अभिनेत्याने खूप मेहनत घेतलीय. त्यानं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांसोबत मिळून 'कांतारा चॅप्टर 1'साठी एक भव्य युद्ध सीन तयार केलाय, यात 500 हून अधिक कुशल सैनिक आणि ३००० लोक सहभागी झाले होते.
चित्रपटातील एक सीन २५ एकर खडकाळ भूभागावर चित्रित करण्यात आलाय. याचे शुटिंग 45-50 दिवस चालू होते. त्यामुळे हा सीन भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वात मोठ्या सीन्सपैकी एक असणार आहे. 'कांतारा चॅप्टर 1' 2 ऑक्टोबर रोजी जगभरात कन्नड, हिंदी, तेलुगू, मल्याळम, तमिळ, बंगाली आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होईल. ऋषभ शेट्टीनं 'कांतारा चॅप्टर 1' ची घोषणा केल्यापासूनच चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.