Reelstar Death: 'चिमणे, परत ये गं...'; रिलस्टार रोहिणीच्या आत्महत्येनंतर पतीची भावुक पोस्ट, पण नेटकरी संतापले, कारण?

Reelstar Death: रील स्टार रोहिणी पाराध्येच्या आत्महत्येनंतर पती निलेश पाराध्येची भावुक पोस्ट व्हायरल झाली. मात्र या पोस्टवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
Reelstar Death
Reelstar DeathSaam tv
Published On

Reelstar Death: सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रम्हपुरी येथील प्रसिद्ध रील स्टार आणि ‘हॉटेल ग्रामपंचायत’ची मालकीण रोहिणी पाराध्ये हिच्या आत्महत्येने संपूर्ण सोलापूर हादरला आहे. २६ मे रोजी रोहिणीने हॉटेलच्या स्वयंपाकघरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली. या धक्कादायक घटनेनंतर सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले असून, तिच्या पती निलेश पाराध्येने केलेल्या एका पोस्टमुळे वाद आणखी वाढला आहे.

रोहिणीच्या निधनानंतर निलेशने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या पत्नीच्या जाण्याचे दु:ख व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने रोहिणीला “माझी चिमणे” असे म्हणत तिच्यासोबतच्या पाच वर्षांच्या सहजीवनाच्या आठवणींना उजाळा दिला. रोहिणीने आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगी त्याला साथ दिली, त्याच्या यशामागे तिचा मोठा वाटा होता आणि तिच्याशिवाय आयुष्य रिकामे झाल्याची भावना त्याने व्यक्त केली. त्याने तिच्यासोबतचे काही खास फोटो पोस्ट केले.

Reelstar Death
Famous Artist Death: प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

या पोस्टमध्ये त्याने लिहिले,माझी बायको माझ्या चिमणे मला सोडून जायचं नव्हतं गं...या पाच वर्षांच्या सोबतीत तिने मला फक्त साथच दिली नाही, तर माझं संपूर्ण आयुष्य उभं केलं. माझ्या प्रत्येक अडचणीत ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. माझ्यासाठी तिने किती हाल सोसले, किती कष्ट केले, याची गणतीच नाही.जेव्हा मी खचून जायचो, तेव्हा ती मला आधार द्यायची. जेव्हा सगळे दूर व्हायचे, तेव्हा ती माझा हात घट्ट धरून उभी राहायची. माझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळातून तिने मला बाहेर काढलं. आज चांगले दिवस यायला लागले होते. आपल्या स्वप्नांना आकार यायला लागला होता. पण त्याच वेळी तू मला एकटं करून निघून गेलीस. आजही तुझी आठवण आली की मन हंबरडा फोडून रडतं. तुझं हसणं, तुझं बोलणं, तुझी काळजी, तुझं प्रेम... सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं. चिमणे... परत ये गं... तुला खूप काही सांगायचं बाकी आहे... तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं झालंय. तू शरीराने दूर गेलीस, पण माझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक आठवणीत आणि हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात कायम जिवंत राहशील. मिस यू ग माझ्या चिमणे.

Reelstar Death
Actress Bath Video Leak: अभिनेत्रीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ लीक', टिव्ही शोमध्ये घडला भयानक प्रकार
Reelstar Death
Reelstar DeathSaam Tv

मात्र, या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. रोहिणीने आत्महत्या केली तेव्हा निलेश हॉटेलच्या बाहेर बसला होता, त्याला तिची अवस्था दिसली नाही का? , ती हॉटेलची मालकीण होती की सर्व जबाबदाऱ्या एकटी सांभाळणारी व्यक्ती?, त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं होत का? अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. त्यामुळे अनेकांनी “जेव्हा ती एवढं टोकाचं पाऊल उचलत होती, तेव्हा तुम्ही कुठे होता?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे. दरम्यान, रोहिणीच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, विविध बाजूंनी चौकशी केली जात आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांदरम्यान आता निलेशने त्याचं कमेंट सेक्शनचं बंद केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com