पुणे: ऑनलाईन कॅब, रिक्षा, टॅक्सी सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांबाबत हल्ली तक्रारी वाढू लागल्या आहे. ग्राहकांशी गैरवर्तन करणे, जास्तीचे पैसै आकारणे, वाहतुकीचे नियम न पाळणे अशा अनेक तक्रारी सध्या दररोज येतात. सामान्य माणसासाठी हे तर रोजचंच झालंय, पण आता या ऑनलाईन अॅपवरील (Online Auto Booking) मुजोर रिक्षाचालकाची (Auto Driver) झळ एका अभिनेत्यालाही बसली आहे. ब्लॉकबस्टर सैराट आणि झुंड यांसारख्या चित्रपटात आपल्या अभिनायची वेगळी छाप सोडणाऱ्या अरबाज शेख याला पुण्यात रॅपिडो अॅपच्या (Rapido Bike Taxi App) रिक्षाचालकानं चक्क शिवीगाळ केली आहे. एवढंच नाही तर त्या रिक्षाचालकाने अरबाजला (Arbaj Aslam Shaikh) भरपावसात रिक्षेतून खाली उतरण्यास सांगितले आणि भाडेही अॅपमध्ये दाखवले आहे त्यापेक्षा जास्त घेतले. हा सगळा वाईट अनुभव अभिनेत्यानं फेसबुकवर शेयर केला आहे, तसेच अशा रिक्षाचालकांवर कारवाई व्हावी अशी मागणीही त्याने केली आहे. (Pune Latest News)
हे देखील पाहा -
अरबाजने फेसबुकवर पुण्यात (Pune) घडलेल्या या सर्व प्रकाराबाबत सविस्तर सांगितलं आहे, अरबाज म्हणाला की, पुण्यात रिक्षाचालकांकडून लूट होते. मी कधीच ओला, उबेर, रॅपिडो असे अॅप वापरत नाही, पण भरपावसात मित्राला त्रास होऊ नये म्हणून अरबाजने मित्राला ऑनलाईन रिक्षा बुक करायला सांगितली, त्यानुसार मित्राने रॅपिडो अॅपवरुन रिक्षा बुक केली. नांदेड शहरातून पुणे रेल्वे स्टेशनला यायचे १९८ रुपये होतात. पण, तरिही रिक्षावाल्याने ६० रुपये ज्यादा मागितले. शिवाय रिक्षावाल्याने खूप फिरवले आणि यावर अबराजने विचारलं असता काहीही उत्तर दिलं नाही. भरपावसात त्या रिक्षावाल्याने अरबाजला ६० रुपये एस्क्ट्रा दे नाहीतर इथेच उतर असा दम दिला, मात्र भरपावसात उतरु शकत नसल्याने आणि ६ वाजता ट्रेन असल्याने अरबाजला वेळेच स्टेशन गाठायचे होते, त्यामुळे अरबाचा नाईलाज होता. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला असता या मुजोर रिक्षाचालकाने अरबाजला चक्क शिवी दिली.
अरबाजने हा घटलेला सर्व वाईट अनुभव फेसबुकवर शेयर केला आहे. तो म्हणाला, मी रिक्षावाल्याला ओळख सांगितली नाही, माझ्यासारख्या रोज पुण्यात राहणाऱ्या माणसाला जर हे असे झेलावे लागत असेल तर गावावरून किंवा फिरण्यासाठी जे लोक पुण्यात येत असतील त्यांचे काय हाल होत असेल? त्यांची हे लोक किती लूट करत असतील असा प्रश्ना त्याने उपस्थित केला आहे. तसेच हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि तपास यंत्रणा यावर मार्ग काढतील असा विश्वास त्याने यावेळी व्यक्त केला आहे. आता पुणे वाहतूक पोलीस या मुजोर रिक्षाचालकावर काय कारवाई करतात आणि रॅपिडो कंपनी याबाबत काय स्पष्टीकरण देते हे पाहावं लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.