'रामायण' चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंगमध्ये बक्कळ कमाई
'रामायण' चित्रपटाचा पहिला भाग २०२६ च्या दिवाळीत रिलीज होणार
१०० कोटींची ओपनिंग
दिवाळीत मनोरंजनाचा धमाका पाहायला मिळणार आहे. रणबीर कपूरचा 'रामायण' चित्रपट ५ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. सध्या सर्वत्र 'रामायण पार्ट - १' (Ramayana: Rise of Legend) ची तुफान चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्येच छप्परफाड कमाई केली आहे. 'रामायण' हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठी ओपनिंग करणारा ठरू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, नितेश तिवारीचा 'रामायण पार्ट - १' हा भव्य चित्रपट 100 कोटी रुपयांची ओपनिंग करण्याची शक्यता आहे. हिंदी आवृत्तीमध्ये पहिल्या दिवशी 50-65 कोटी रुपये कलेक्शन होऊ शकते. तसेच इतर भाषेतील आवृत्तीत 45-50 कोटी रुपयांचा व्यवसाय होऊ शकतो. 4000 कोटींचा बजेट असलेला हा चित्रपट जगभरात धुमाकूळ घालणार आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने 2 नोव्हेंबरपर्यंत जगभरातील ॲडव्हान्स बुकिंगमध्ये सुमारे 75 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
'रामायण' मध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत, तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय, साऊथ अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत झळकणार आहे. सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात अरुण गोविल, लारा दत्ता, रकुल प्रीत सिंग, कुणाल कपूर आणि काजल अग्रवाल यांसारख्या अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
'रामायण' चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'रामायण: राईज ऑफ अ लेजेंड' चित्रपट जिओहॉटस्टार (JioHotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.'रामायण' चित्रपटाला संगीतकार ए. आर. रहमान आणि हन्स झिमर यांनी संगीत दिले आहे. 'रामायण' चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर जगभरात रिलीज होणार आहे. चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि इंग्रजी भाषांत प्रदर्शित होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.