Ram Charan: तेलुगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राम चरण आणि त्यांची पत्नी उपासना कॅमिनेनी यांनी दुसऱ्या बाळाच्या आगमनाची आनंदाची घोषणा केली आहे. याबाबत त्यांनी इंस्टाग्रामवर एक खास व्हिडिओ शेअर केला, ज्यात उपासनाला पाहुण्यांकडून भेटवस्तू आणि आशीर्वाद दिले जाताना दाखवले आहे.
व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे, “Double the joy, double the love, double the blessings”, ज्याचा अर्थ आहे – दुहेरी आनंद, दुहेरी प्रेम आणि दुहेरी आशीर्वाद. व्हिडिओच्या शेवटी “नवीन प्रारंभ” असा कॅप्शन दिले आहे. .
नुकताच राम चरण ‘गेम चेंजर’ चित्रपटात दिसला होता. आगामी ‘पेड्डी’ या चित्रपटातही त्याची भूमिका पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर या घोषणा नंतर चाहत्यांकडून आणि मित्रांपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राम चरण आणि उपासनाला त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या आगमनासाठी भरपूर प्रेम आणि आशीर्वाद मिळत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.