रक्षाबंधनाचा सण बॉलिवूड सेलिब्रिटी मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसत आहे. सोशल मीडियावर आपल्या बहीण-भावासाठी खास पोस्ट करत ते या सणानिमित्त चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत. बॉलिवुडचा सुपरस्टार अर्जुन कपूरने रक्षाबंधनानिमित्त सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्याने आपल्या चाहत्यांना आणि देशातील नागरिकांना मोलाचा सल्ला दिला आहे. या पोस्टद्वारे अर्जुन कपूरने कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरणाचा उल्लेख करत देशातील महिलांच्या सुरक्षेवर लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. अर्जुन कपूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अर्जुन कपूरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणतो की, 'मी माझ्या बहिणींसोबत रक्षाबंधन सण साजरा करणार आहे. पण कोलकातामध्ये घडलेल्या घटनेमुळे काय बोलावं हे समजत नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी माझ्या बहिणी मला राखी बांधतात आणि त्यांचे संरक्षण करण्याचे वचन दिलं जातं. मात्र समाजातील अशिक्षित लोकांमुळे किंवा काही नराधमांमुळे देशातील महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष देणं गरजेचं आहे.'
अर्जूनने पुढे असे सांगितले की, 'देशातील पुरुषांनी महिलेचा आदर आणि सन्मान केला पाहिजे. त्यासोबतच भारत सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी काही विशेष पाऊलं उचलणं गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या मुलांना एखाद्या महिलेसाठी सकारात्मक आणि सुरक्षित वातावरण कसे निर्माण करायचे हे शिकवणं गरजेचे आहे. मुलगी घराची शान असते त्यांची काळजी आणि त्यांची सुरक्षा आपली सर्वात पहिली जबाबदारी असते. त्याचबरोबर प्रत्येक मुलीनं तिच्या हक्कासाठी आणि तिच्या सुरक्षततेची काळजी स्वत: घेतली पाहिजे.'
व्हिडीओच्या शेवटी त्याने असे देखील म्हटले आहे की, 'या देशातील प्रत्येक महिला सुरक्षित आणि खुश राहिली पाहिजे. देशातील महिलांच्या सुरक्षेची कळजी पुरुषांनी सुद्धा घेतली पाहिजे. आज रक्षाबंधनानिमित्त अर्जुन त्याच्या बहिनींसोबत रक्षाबंधन सण साजरा करणार असल्याचे त्याने सांगितले. सध्या सोशल मीडियावर अर्जुन कपूरच्या रक्षाबंधन स्पेशल पोस्टची चर्चा होत आहे. त्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी देखील त्याच्या पोस्टला लाइक करत त्याने योग्य मत मांडले असल्याचे म्हटले आहे.
Edited By: Nirmiti Rasal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.