Rakshabandhan Gift: यंदाच्या रक्षाबंधनाला बहिणींना द्या स्पेशल गिफ्ट; या योजनांमध्ये गुंतवणूक करुन भविष्य करा सुरक्षित

Rakshabandhan Special Financial Investment Gift: यंदाच्या रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या बहिणीला काहीतरी वेगळं गिफ्ट द्या. तुम्ही तुमच्या बहिणीच्या नावाने गुंतवणूक करा. त्यामुळे तिला भविष्यात आर्थिक अडचण येणार नाही.
Rakshabandhan Gift
Rakshabandhan GiftSaam Tv
Published On

आज संपूर्ण राज्यात रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. रक्षाबंधनाला प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीसाठी खास भेटवस्तू घेतो. यंदाच्या रक्षाबंधनाला बहिणीला असं गिफ्ट द्या की जे तिला आयुष्यभर उपयोगी होईल. रक्षाबंधनानिमित्त भाऊ बहिणीला रोख रक्कम, ज्वेलरी किंवा कपडे असे गिफ्ट देतात. यंदाच्या रक्षाबंधनानिमित्त तुम्ही बहिणीसाठी एखाद्या एफडी किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा.

Rakshabandhan Gift
Free Silai Machine Scheme: खुशखबर! महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन; केंद्र सरकारची खास योजना; अर्जप्रक्रिया जाणून घ्या

म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंड ही एक लाँग टर्म गुंतवणूक आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्याने तुम्हाला काही वर्षांनी ठरावीक रक्कम मिळेल. हे पैसे तुमची बहीण उच्च शिक्षणासाठी वापरु शकते. यामध्ये तुम्हाला दर महिन्याला एसआयपीद्वारे गुंतवणूक करायची असते.

स्टॉक्समध्ये गुंतवणूक

तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करु शकतात. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्याने तुम्हाला जास्त परतावा मिळतो. यामुळे तुमच्या बहिणीचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुखकर होऊ शकते. यामध्ये गुंतवणूक करताना योग्य सल्ला घ्या.

सोने- चांदी

तुम्ही तुमच्या बहिणीला सोन्याचा एखादा दागिना गिफ्ट घेऊ शकतात. सोन्याचा दागिना ही एक गुंतवणूक असते. सोन्याचे भाव सतत वाढत आहेत .त्यामुळे बहिणीला या गिफ्टचा भविष्यात खूप फायदा होईल.

Rakshabandhan Gift
Atal Pension Scheme: रोज ७ रुपये गुंतवा अन् आयुष्यभर ६०,००० रुपयांची पेन्शन मिळवा;काय आहे अटल पेन्शन योजना?

एफडी

रक्षाबंधनानिमित्त तुम्ही बहिणीच्या नावाने एफडीमध्ये गुंतवणूक करु शकतात. एफडीमध्ये तुम्हाला निश्चित व्याजदर मिळते. त्यामुळे काही वर्षांनी तुम्हाला ठरावीक रक्कम मिळेल.

टीप- वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकापर्यंत पोहचवक आहोत. तुम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या.

Rakshabandhan Gift
Post Office Scheme: महिलांसाठी खास योजना! एकदा गुंतवणूक करा अन् २ वर्षात लखपती व्हा; जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com