राखीनं सांगितलं Bigg Bossच्या विजेत्याचं नाव, म्हणाली, 'तो नाही जिंकला तर...'

Rakhi Sawant Prediction Of Bigg Boss 18 Winner: अभिनेत्री राखी सावंतने 'बिग बॉस 18'चा विजेता कोण होणार याची भविष्यवाणी केली आहे. राखीने घरातील कोणत्या सदस्याचे नाव घेतले जाणून घ्या.
Rakhi Sawant Prediction Of Bigg Boss 18 Winner
Bigg Boss 18SAAM TV
Published On

ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant ) कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने आपल्या अनोख्या स्टाईलने अनेकांना वेड लावले आहे. तिने आजवर अनेक हिंदी मालिका, चित्रपटात काम केले आहे.

सध्या राखी सावंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात राखीने 'बिग बॉस 18' च्या (Bigg Boss 18) विजेत्याची भविष्यवाणी केली आहे. तिने इंस्टाग्रामावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने 'बिग बॉस 18'च्या विजेत्याचे आणि उपविजेत्याचे नाव सांगितले आहे.

राखी सावंतने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने सांगितले की, "विवियन (Vivian Dsena) 'बिग बॉस 18'चा विजेता होणार आहे. तर करणवीर मेहरा उपविजेता होणार आहे." जर कोणी विवियनबद्दल काही बोलले तर मी त्यांना हाणून पाडेन, असे ती बोली. तसेच तिने सांगितले की, "विवियनला आयुष्यात खूप कठीण परिस्थितीला सामना करावा लागला आहे. त्याच्या लग्नात अनेक अडचणी आल्या आहेत. पण त्याने दिवस रात्र काम केले आहे. त्याची मेहनत तुम्हाला काही माहित नसेल तर उगाच त्याला बोलू नका."विवियन जिंकला नाही तर मी टेरेसवरुन उडी मारेन. तसेच पंख्याला लटकेन", असे व्हिडिओच्या शेवटी राखी बोली.

राखी सावंत स्वतः देखील बिग बॉसचा भाग राहिली आहे. तिने आपल्या खास अंदाजात प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सलमान खानने देखील राखीच्या गेमचे कौतुक केले आहे.

Rakhi Sawant Prediction Of Bigg Boss 18 Winner
Anusha-Bhushan : 'Love You...'; भूषण प्रधान अन् अनुषा दांडेकर यांच्यात प्रेम फुललं, 'त्या' पोस्टमुळे चर्चेला उधाण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com