Box Office Collection Report: 'वॉर २' आणि 'कुली'च्या कमाईला ब्रेक लागायला सुरुवात; 'महावतार नरसिंह'ने मारली बाजी

Box Office Collection Report: बॉक्स ऑफिसवर तीन चित्रपट खूप गाजत आहेत.त्यापैकी दोन स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित झाले होते, परंतु 'महावतार नरसिंह' प्रदर्शित होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे.
Box Office Collection Report
Box Office Collection ReportSaam Tv
Published On

Box Office Collection Report: बॉक्स ऑफिसवर सध्या तीन मोठे चित्रपट चर्चेत आहेत रजनीकांतचा 'कुली', हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरचा 'वॉर २' आणि अॅनिमेटेड चित्रपट 'महावतार नरसिंह'. या तिन्ही चित्रपटांना जोरदार स्पर्धा सुरु आहे. पण, सोमवारी झालेल्या कलेक्शनमध्ये 'कुली' आणि ''वॉर २' यांची जादू फेल होत असल्याचे दिसून आले.

'कुली'

सुपरस्टार रजनीकांतच्या 'कुली'ने रिलीज झाल्यापासून बरीच कमाई करून बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवले आहे. या चित्रपटाने १२ व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या सोमवारी २.५२ कोटी रुपयांचा कलेक्शन केले. यासह, चित्रपटाचा एकूण कलेक्शन २५९.८७ कोटींवर पोहोचला आहे. २५९.८७ कोटींचं कलेक्शन करुनही या चित्रपटच्या कमाईला ब्रेक लागायला सुरुवात झाली आहे.

Box Office Collection Report
Stand Up Comedian Death: प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियनची गोळ्या घालून हत्या; संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात

‘वॉर २’

दुसरीकडे, हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्या ‘वॉर २’ ने सुरुवात चांगली केली होती, परंतु आता चित्रपटाची गती मंदावत आहे. दुसऱ्या रविवारीही चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये कोणतीही वाढ झाली नाही. ११ व्या दिवशी चित्रपटाने फक्त ६.६० कोटी रुपये कमावले आणि सोमवारी हा आकडा २.२५ कोटी रुपयांवर आला. १२ दिवसांत या चित्रपटाचे एकूण कलेक्शन २२४.२५ कोटी रुपये झाले आहे.

Box Office Collection Report
Bigg Boss 19: बिग बॉस १९ मध्ये सर्वात श्रीमंत कोण? जाणून घ्या स्पर्धकांची एकूण संपत्ती

‘महावतार नरसिंह’

या दोन चित्रपटांमध्ये, महावतार नरसिंह या अॅनिमेटेड चित्रपटाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. सहसा अॅनिमेटेड चित्रपट भारतात मोठी कमाई करत नाहीत, परंतु या चित्रपटाने एक विक्रम केला आहे. रिलीजच्या एका महिन्यानंतरही हा चित्रपट कोटींमध्ये कलेक्शन करत आहे. पाचव्या सोमवारी म्हणजेच ३२ व्या दिवशी चित्रपटाने १.२५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. यासह एकूण कलेक्शन २३३ कोटींवर पोहोचले आहे. हा चित्रपट केवळ मुलांनाच नाही तर कुटुंबांनाही थिएटरकडे आकर्षित करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com