Punha Ekda Sade Made Teen: नाताळची खास भेट! ‘कुरळे ब्रदर्स’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'पुन्हा एकदा साडे माडे तीन'ची तारीख जाहीर

Punha Ekda Sade Made Teen Marathi Movie : ‘कुरळे ब्रदर्स’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ चित्रपट या दिवशी प्रदर्शित होणार. नवं पोस्टर, कलाकार आणि संपूर्ण माहिती वाचा.
Punha Ekda Sade Made Teen
Punha Ekda Sade Made TeenSaam Tv
Published On

Punha Ekda Sade Made Teen: नाताळ म्हणजे आनंद, भेटवस्तू आणि मनमुराद हसू आणि याच नाताळच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीतून प्रेक्षकांसाठी एक खास हास्याची भेट जाहीर झाली आहे. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ‘कुरळे ब्रदर्स’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज झाले असून ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं नवं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर झळकलं आहे. या पोस्टरसोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली असून हा चित्रपट येत्या ३० जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

Punha Ekda Sade Made Teen
Vintage Car At Thane | ठाण्यात विंटेज कार, पोलिसांकडून जनजागृती

पोस्टर पाहताच एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे, यावेळी गोंधळ डबल आहे… आणि धमालही डबल! साध्या परिस्थितीतून प्रचंड गोंधळ निर्माण करणं ही ‘साडे माडे तीन’ची खास ओळख असून नव्या पोस्टरमधूनही ती ठळकपणे जाणवते. त्यामुळेच या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Punha Ekda Sade Made Teen
Fabric For Winter: 'हे' पाच प्रकारचे कापड तुम्हाला हिवाळ्यातही उबदार ठेवतात, तुमच्याकडे आहेत का या कापडाचे कपडे?

साडे माडे तीन’चा पहिला भाग आजही प्रेक्षकांच्या आठवणीत ताजा आहे. भावंडांमधील जिव्हाळा, निरागस विनोद आणि पोट धरून हसवणारे प्रसंग यामुळे हा चित्रपट मराठी प्रेक्षकांच्या हृदयात कायमचा घर करून बसला. विशेष म्हणजे या पहिल्या भागाचं दिग्दर्शनही अंकुश चौधरी यांनीच केलं होतं. अभिनेता म्हणून लोकप्रिय असलेले अंकुश चौधरी दिग्दर्शक म्हणूनही तितकेच सक्षम असल्याचं त्यांनी वेळोवेळी सिद्ध केलं आहे.

आता तब्बल १९ वर्षांनंतर ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या माध्यमातून त्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. निर्मात्या उषा काकडे म्हणतात, “हा चित्रपट म्हणजे केवळ पुढचा भाग नाही, तर प्रेक्षकांच्या आठवणींवरची प्रेमाची फुंकर आहे.” तर निर्माता अमेय खोपकर यांच्या मते, जुना आणि नवा प्रेक्षक दोघांनाही एकत्र हसवणं हेच या चित्रपटाचं मोठं यश आहे.

या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संकेत पाठक, संजय नार्वेकर आणि समृद्धी केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यामुळे येत्या ३० जानेवारीला मराठी प्रेक्षकांना हास्याचा धमाका अनुभवायला मिळणार, हे नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com