Priya Marathe Serial: 'प्रियाला रिप्लेस करताना...'; मालिकेत प्रिया मराठेच्या जागी भूमिका साकारताना भावूक झाली 'ही' अभिनेत्री

Tejaswini Lonari On Priya Marathe: दिवंगत अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत ती साकारत असलेली मोनिका ही भूमिका आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीला देण्यात आली आहे. याबद्दल अभिनेत्रीने मत व्यक्त केलं आहे.
Tejaswini Lonari On Priya Marathe
Tejaswini Lonari On Priya MaratheSaam Tv
Published On

Tejaswini Lonari On Priya Marathe: अभिनेत्री तेजस्विनी लोणारी सध्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या मालिकेत सुरुवातीला ही भूमिका दिवंगत अभिनेत्री प्रिया मराठे यांनी साकारली होती. प्रियाच्या जाण्यानंतर तेजस्विनीला तिच्या जागी ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि त्याबद्दल तीने व्यक्त केलेल्या भावना अत्यंत हृदयस्पर्शी आहेत.

तेजस्विनी म्हणते, “प्रियाला रिप्लेस करताना मला प्रचंड ताण आला होता. खरं तर मी तिला स्वतः विचारलं होतं की तुला का रिप्लेस करत आहेत. तिने जेव्हा मला ते सांगितलं, तेव्हा माझ्या अंगावर शहारे आले. कारण ती या मालिकेतून कमबॅक करत होती. तिचं मराठी बोलणं, भूमिकेतील सहजता, तिचा स्क्रीन प्रेझेन्स हे सगळं अतिशय छान होतं. अशा अभिनेत्रीला रिप्लेस करणं हे माझ्यासाठी सोपं नव्हतं.”

Tejaswini Lonari On Priya Marathe
Diljit Dosanjh: पहलगाम हल्ल्यापूर्वी माझा चित्रपट बनवण्यात आला...; दिलजीत दोसांझची भारत-पाक सामन्यावर टीका, काय म्हणाला?

तेजस्विनी पुढे म्हणली की, “प्रिया खूप सुंदर व्यक्ती होती. तिच्यासोबत माझं खूप छान नातं होतं. मला ती खूप आवडायची. तिच्या जाण्यानंतर ही भूमिका करताना मला नेहमी तिची आठवण येते. आजही या सगळ्या गोष्टी आठवल्या की मनात हळहळ निर्माण होते.”

Tejaswini Lonari On Priya Marathe
A.R. Rahman: ए.आर. रहमान यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा; चोरीचा आरोप फेटाळला, नेमकं प्रकरण काय?

प्रिया मराठेने वयाच्या केवळ ३८व्या वर्षी, ३१ ऑगस्ट २०२५ रोजी कर्करोगाशी झुंज देत जगाचा निरोप घेतला. तिच्या निधनानंतर तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत ती साकारत असलेली मोनिका ही भूमिका तेजस्विनी लोणारीला देण्यात आली. प्रेक्षकांच्या मनात प्रियाची प्रतिमा कायम आहे आणि त्याच भावनिक पार्श्वभूमीवर तेजस्विनी ही भूमिका येत्या काळात छोट्या पडद्यावर साकारणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com