PM Narendra Modi on Pathaan: 'पठान' चित्रपटावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप नेत्यांना खडेबोल, म्हणाले 'चित्रपटांवर सल्ले देण्यापेक्षा...'

'पठान' चित्रपटावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप नेत्यांना फटकारले.
PM Narendra Modi on Pathaan Movie
PM Narendra Modi on Pathaan MovieSaam Tv

PM Narendra Modi on Pathaan Movie Controversy: शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटाला अजूनही विरोध होता आहे. 'पठान' चित्रपटावर अनेक नेत्यांनी रोष व्यक्त केला आहे. 'पठान' चित्रपटावरून आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप नेत्यांना फटकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप नेत्यांना चित्रपटांवर अनावश्यक वक्तव्ये टाळण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. २५ जानेवारीला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान पंतप्रधानांच्या या वक्तव्यामुळे चित्रपटासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते.

PM Narendra Modi on Pathaan Movie
Pathaan Movie: 32 वर्षांचं अधुरं स्वप्न पूर्ण झालं! 'पठान' चित्रपटादरम्यान शाहरुखने उलघडले रहस्य

'पठान' चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यातील दीपिका पदुकोणच्या भगव्या बिकिनीमुळे भारतात गदारोळ निर्माण झाला होता. यामुळे भाजपच्या नेत्यांनी चित्रपटावर बंदी घालायची मागणी केली होती. तसेच विविध प्रकारे आंदोलन करून चित्रपटाला विरोध केला होता.

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षश्रेष्ठींना सल्ला आणि सूचना दिल्या आहेत. मीडिया अहवालानुसार, 16-17 जानेवारी रोजी दिल्लीत झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान म्हणाले की, आम्ही दिवसभर काम करतो आणि काही लोक चित्रपटावर वक्तव्ये करतात, त्यानंतर ते दिवसभर टीव्ही दिसतात आणि मीडियावर फक्त तेच चालते. त्यामुळे अनावश्यक विधाने टाळावीत.

शाहरुखच्या 'पठान' चित्रपटाबाबत अनेक राजकीय वक्तव्ये पाहायला मिळाली. भाजप नेत्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी भगव्या कपड्यांवर नाराजी व्यक्त केली, तर खासदार गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, 'पठान' चित्रपटातील गाण्यात दीपिका पदुकोणने परिधान केलेले कपडे आक्षेपार्ह आहेत. याशिवाय महाराष्ट्राचे भाजप नेते राम कदम यांच्यासह अनेकांनी 'पठान'बाबत राजकीय वक्तव्ये केली. एवढेच नाही तर भाजपच्या अनेक नेत्यांनी 'पठान' चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com