Shahrukh Khan
Shahrukh Khan SaamTv

Pathaan Movie: 32 वर्षांचं अधुरं स्वप्न पूर्ण झालं! 'पठान' चित्रपटादरम्यान शाहरुखने उलघडले रहस्य

यशराज फिल्म्सने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शाहरुख खानची एक मुलाखत शेअर केली आहे.

Shah Rukh Khan Interview During Pathan Promotion: बॉलिवूडच किंग खान नेहमीच चर्चेत असतो. सध्या शाहरुख त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'पठान' हा त्याच्या आगामी चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यामुळे प्रचंड गदारोळ निर्माण झाला होता. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा चित्रपटाची आणि त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी बोलले जात आहे.

Shahrukh Khan
Genelia-Ritesh Deshmukh | वेड चित्रपटानिम्मित रितेश-जेनेलियाची प्लाझा सिनेमागृहाला भेट | Ved Movie

दरम्यान, यशराज फिल्म्सने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शाहरुख खानची एक मुलाखत शेअर केली आहे. या मुलाखतीत किंग खान चित्रपटाशी संबंधित अनेक खुलासे करताना आणि प्रश्नांची उत्तरे देताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख खानने सांगितले आहे की, पठानच्या माध्यमातून त्याचे 32 वर्षापूर्वीचे स्वप्न पूर्ण होत आहे. शाहरुख सांगत आहे की, तो अॅक्शन हिरो बनण्यासाठी इंडस्ट्रीत आला होता. पण घडले उलटे, अॅक्शन हिरोऐवजी तो रोमँटिक हिरो बनला.

शाहरुखने सांगितले की, त्याला अॅक्शन हिरो बनायचे आहे, परंतु त्याला 'डीडीएलजे' देखील खूप आवडतो. त्याला राहुल आणि राज ही पात्रे देखील आवडतात. पण त्याला नेहमी वाटत होतं की तो एक अॅक्शन हिरो झाला असता तर… त्यामुळे त्याच्यासाठी हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे. याशिवाय शाहरुखने त्याचे सहकलाकार दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम या दोघांचेही कौतुक केले. बेशरम रंगासाठी दीपिकासारख्या व्यक्तीची गरज होती, जी अ‍ॅक्शनही करू शकेल, असे शाहरुख म्हणाला.

शाहरुख पुढे म्हणाला की, दीपिका अॅक्शनसाठी खूप स्ट्रॉन्ग आहे. अॅक्शन सीन्समध्ये ती माझ्यापेक्षा टफ आहे. तसेच किंग खानने जॉन अब्राहमचेही खूप कौतुक केले. त्याच्यासोबत काम करताना खूप आनंद होत आहे.

'पठान' चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. निर्मात्यांसोबतच चाहत्यांनाही या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com