Pravin Tarde: आरारारा खतरनाक प्रवीण तरडेने अभिनयाचा जॉनरच बदलला

Pravin Tarde: दिनिशा फिल्म्स' निर्मित ‘आणीबाणी’ या मराठी चित्रपटात त्याचा हा विनोदी अंदाज पहायला मिळणार आहे.
Pravin Tarde
Pravin TardeSaam tv
Published On

Pravin Tarde News: वैविध्यपूर्ण भूमिकांमधून लेखक, अभिनेता प्रवीण तरडे याने स्वतःची वेगळी शैली निर्माण केली आहे. नेहमीच दमदार भूमिकांमध्ये दिसणारे प्रवीण तरडे प्रथमच एका विनोदी भूमिकेत आपल्याला पहायला मिळणार आहेत. 'दिनिशा फिल्म्स' निर्मित ‘आणीबाणी’ या मराठी चित्रपटात त्याचा हा विनोदी अंदाज पहायला मिळणार आहे. हा चित्रपट २८ जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘आणीबाणी’ सारखा संवेदनशील विषय रंजकपणे मांडण्याचं धाडस दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी लेखक अरविंद जगताप यांच्या सोबतीने दाखवलं आहे. (Latest Marathi News)

प्रत्येक गावांत एक अवलिया असतो. गावातल्या अनेक छोटया मोठया गोष्टींची बित्तंमबातमी त्याच्याकडे असते. अनेकदा गावात घडणाऱ्या चांगल्या, वाईट घडामोडींनाही तोच जबाबदार असतो.

सगळ्यांशी जवळीक असलेल्या पैलवान केशवची मजेशीर व्यक्तिरेखा प्रवीण तरडे साकारत आहेत. पहाता क्षणी हसू येईल अशी केशभूषा आणि वेशभूषा तरडेनी यात केली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमधून त्याची मिश्किल छबी आपल्याला पहायला मिळते आहे.

Pravin Tarde
Best Indian Movies - Web Series in 2023 : यंदा रँकिंगमध्ये कोणते चित्रपट, वेबसीरिज ठरल्या अव्वल, यादी आली समोर

आपल्या या नव्या भूमिकेविषयी बोलताना प्रवीण तरडे म्हणाला, या भूमिकेने मला आजवर न मिळालेली व्यक्तिरेखा साकारण्‍याची संधी दिली. ‘आणीबाणी’ मध्‍ये उत्तम कलाकार व टीमसोबत काम करण्‍याचा अनुभव खूप छान होता.

कृष्णा जगताप, योगेश शिंदे, सचिन जगताप, अमोल महाडिक ‘आणीबाणी’ चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा,पटकथा,संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. गीतकार वलय मुळगुंद आणि प्रसन्न यांनी लिहिलेल्या गीतांना हरिहरन, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, सायली पंकज, गणेश चंदनशिवे यांनी स्वरबद्ध केले आहे. देवदत्त मनीषा बाजी, आदित्य पटाईत, पंकज पडघन यांनी संगीतसाज दिला आहे.

Pravin Tarde
बाईपण भारी देवा चित्रपटाने रचला विक्रम ; Box Office Collection मध्ये तब्बल १०० टक्क्यांनी वाढ

पार्श्वसंगीत पंकज पडघन यांचे आहे. साऊंड डिझाईनची जबाबदारी निखिल लांजेकर यांनी सांभाळली आहे. छायांकन मंगेश गाडेकर, संकलन प्रमोद कहार, नृत्यदिग्दर्शक संग्राम भालकर आहेत. ‘आणीबाणी’ चित्रपट २८ जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com