Prajakta Mali At MahaKumbhMela
Prajakta Mali At MahaKumbhMela Saam tv

Prajakta Mali : प्राजक्ता माळी पोहोचली महाकुंभमेळ्यात, त्रिवेणी संगमात केलं शाही स्नान, पाहा VIDEO

Prajakta Mali At MahaKumbhMela : अभिनेत्री प्राजक्ता माळीने महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान केले आहे. तिने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत महाकुंभमेळ्याचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला.
Published on

Prajakta Mali MahaKumbhMela Video : सध्या प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. या पवित्र संगमावर जाऊन स्नान करण्यासाठी फक्त देशातूनच नाही, तर परदेशातूनही लोक येत आहेत. राजकीय नेत्यांनीही कुंभमेळ्यात सहभाग घेतला आहे. हेमा मालिनी, अनुपम खेर, मिलिंद सोमण यांसारख्या अनेक बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनीही संगमस्थानाला भेट दिली आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने देखील महाकुंभमेळ्यात पोहोचली आहे.

प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे. प्राजक्ताने तिचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओवरुन ती प्रयागराजला महाकुंभमेळ्यासाठी गेल्याचे दिसते. प्राजक्ता विमानाने प्रयागराजला पोहोचली. तिने श्री निरंजनी पंचायची आखाडाला भेट दिली. कुटुंबियांसह तिने त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केल्या. याला तिने 'Once in Lifetime Experience' असे म्हटले आहे.

या व्हिडीओला प्राजक्ता माळीने 'लहानपणापासूनच कुंभ मेळ्याविषयी मनात कुतूहल होतं. १४४ वर्षांनी होणारा हा मेळा याची देही याची डोळी पहावा, अनुभवावा असं मनात आलं आणि पोचले' असे कॅप्शन दिले आहे. मी कालच महाराष्ट्रात पुन्हा परतल्याचेही चाहत्यांना सांगितले. प्राजक्ताने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Prajakta Mali At MahaKumbhMela
Prajakta Mali: लाखो दिलो की धडकन प्राजक्ता माळीचा क्रश कोण? नाव वाचून बसेल धक्का

प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. अभिनयासह ती सूत्रसंचालनदेखील करते. याशिवाय तिने निर्माती म्हणूनही काम केले आहे. ती प्रयागराजला महाकुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी गेली होती. याआधीही प्राजक्ताने देव दर्शनासाठी विविध मंदिरांना, आधात्मिक स्थळांना भेटी दिल्या आहेत.

Prajakta Mali At MahaKumbhMela
Chhaava Advance Booking : इतिहास घडणार अन् रेकॉर्ड मोडणार; 'छावा' येतोय! ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात; तिकिटाचे दर किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com