Prabhas Injured : आता मला ही मोठी संधी सोडावी लागेल... ; 'फौजी'च्या सेटवर प्रभास जखमी, मागितली चाहत्यांची माफी !

Prabhas Injured : प्रभास सध्या अनेक मोठे चित्रपट काम करत आहे. त्याचा 'द राजा साब' २०२५ प्रदर्शित होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो 'फौजी' चित्रपटाचे शूटिंग करत होता. दरम्यान, शूटिंगदरम्यान जखमी झाल्याची माहिती त्यांनी दिली. आता या दुखापतीमुळे त्याला मोठी संधी सोडावी लागली आहे. ज्यासाठी त्याने चाहत्यांची माफीही मागितली आहे.
Prabhas New Movie
PrabhasGoogle
Published On

Prabhas Injured : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा प्रसिद्ध अभिनेता बाहुबली प्रभासने यंदा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. त्यांचा 'कल्की 2898 एडी' चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. सध्या प्रभास त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या दरम्यान, प्रभासने या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाल्याची माहिती दिली आहे. त्याचा 'द राजा साब' हा चित्रपट २०२५ साली प्रदर्शित होणार आहे. मात्र तो यावेळी 'फौजी' या त्याच्या पाईपलाईनमध्ये असलेल्या चित्रपटाचे शूटिंग करत होता त्यावेळी सेटवर जखमी झाला.

या दुखापतीमुळे प्रभासला मोठी संधी सोडावी लागली आहे. ज्यासाठी त्याने चाहत्यांची माफीही मागितली आहे. X (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यात लिहिले आहे की- माझ्या कामाबद्दल आणि मला इतके प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. बऱ्याच दिवसांपासून जपानला जाण्यासाठी उत्सुक होतो. पण शूटिंगदरम्यान त्याचा पाय जखम झाली.

प्रभासने का मागितली चाहत्यांची माफी?

प्रभासचा 'कल्की 2898 एडी' यावर्षी जगभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने जगभरातून १०४२ रुपयांचा गल्ला केला.जपानमध्ये 'कल्की 2898एडी' चा प्रीमियर होणार आहे, त्याआधी प्रभासला प्रमोशनसाठी जपान येथे जावे लागणार होते. मात्र आता त्याला ही विशेष संधी सोडावी लागणार आहे. वास्तविक हा चित्रपट ३ जानेवारी २०२५ रोजी जपानमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याआधीच जपानमध्ये चित्रपटाबाबत जोरदार जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Prabhas New Movie
Sonakshi Sinha : 'पुढे काही बोलण्यापूर्वी...', मुकेश खन्ना यांच्या विधानावर सोनाक्षीने सुनावले खडे बोल...

प्रभासचे जपानी चाहतेही त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आता त्याला जाणे शक्य नाही, त्यामुळे त्यांनी माफी मागितली आहे. यावेळी त्यांनी चित्रपटाचे वितरक ट्विनचेही कौतुक केले. त्याने लिहिले की- “ट्विन खूप आश्वासक आहे आणि त्याच्या प्रयत्नांसाठी आम्ही त्याचे आभार मानतो. लवकरच भेटण्याची आशा आहे. ”

Prabhas New Movie
Swapnil Joshi : वर्ष संपताना स्वप्नीलनं दिली चाहत्यांना खास भेट; गुजराती चित्रपटात दमदार पदार्पण,सिनेमाचं नाव काय?

प्रभास कोणत्या चित्रपटाचे शूटिंग करत होता?

प्रभास सध्या 'फौजी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे, मात्र दुखापतीमुळे तो ब्रेकवर आहे. हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होऊ शकतो. सध्या अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. ॲक्शनने भरलेल्या या पीरियड ड्रामामध्ये प्रभास एका सैनिकाची भूमिका साकारत आहे. हनु राघवपुडीचा हा चित्रपट Mythri Movie Makers निर्मित करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com