
Sonakshi Sinha : शक्तिमान म्हणून तरुणांमध्ये प्रसिद्ध असलेले अभिनेते मुकेश खन्ना यांनी साकारलेल्या पात्रांमुळे प्रेक्षकांच्या मनात त्यांच्या विषयी विशेष स्थान आहे. 'महाभारत'मध्ये 'भीष्म पितामह' आणि 'शक्तीमान'सारख्या उत्तम भूमिका मुकेश खन्ना यांनी साकारल्या आहेत. पण मुकेश खन्ना त्यांच्या अभिनयासोबतच अनेकदा आपल्या वाक्यांमुळे चर्चेत राहतात. त्यांनी रणवीर सिंगपासून ते शत्रुघ्न सिन्हापर्यंत अनेक स्टार्सविषयी आपले मत मांडले आहे. मुकेश खन्ना यांनी अलीकडेच शत्रुघ्न सिन्हा यांना प्रश्न केला की त्यांना सोनाक्षी सिन्हालाच्या 'रामायण' सारख्या महाकाव्याचे धडे दिले नाही का? जेव्हा सोनाक्षीला केबीसीमध्ये बोलावले तेव्हा तिला रामायणाविषयी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर का देता आले नाही.या त्यांच्या प्रश्नावर सोनाक्षी सिन्हाने आपले मौन तोडत मुकेश खन्ना यांना स्पष्ट उत्तर दिले आहे.
मुकेश खन्ना यांनीही शत्रुघ्न सिन्हा यांच्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यावर सोनाक्षीने संतापून प्रत्युत्तर दिले. वास्तविक, हा एपिसोड अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनगा करोडपती' या शोशी संबंधित आहे. मुकेश खन्ना केबीसीमधील ज्या एपिसोडबद्दल बोलले त्यामध्ये सोनाक्षी सिन्हाला हनुमानांवर आधारित प्रश्न विचारण्यात आले होते. त्याप्रश्नाचे सोनाक्षीला उत्तर न देता आल्यामुळे मुकेश खन्ना यांनी सोनाक्षीचे वडील ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना स्वतः मनोरंजन सृष्टीत काम करत असूनही मुलीला आपल्या संस्कृतीविषयी ज्ञान न दिल्याचे आरोप केले.
मुकेश खन्ना यांना प्रत्युत्तर देताना सोनाक्षीने इन्स्टाग्राम स्टोरीजच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली. तिने लिहिले, 'मी नुकतेच तुमचे विधान वाचले, ज्यामध्ये तुम्ही म्हटले होते की मी अनेक वर्षांपूर्वी ज्या कार्यक्रमात गेले होते, त्या शोमध्ये मी 'रामायण'शी संबंधित प्रश्नाचे योग्य उत्तर दिले नाही ही माझ्या वडिलांची चूक आहे. सर्वप्रथम, मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छिते की त्या दिवशी हॉट सीटवर दोन महिला होत्या ज्यांना त्याच प्रश्नाचे उत्तर माहित नव्हते, परंतु तुम्ही वारंवार माझे आणि फक्त माझे नाव घेत आहात.
सोनाक्षीने स्पष्ट केले की केबीसीवरील तिची चूक ही केवळ 'मानवी चूक' होती ज्यामध्ये ती विसरली की संजीवनी बूटी कोणासाठी आणली होती. पण स्पष्टपणे, भगवान रामने शिकवलेले क्षमा करण्याचे धडे देखील आपण विसरलात. मुकेश खन्ना यांनी लक्ष वेधण्यासाठी ही घटना पुन्हा पुन्हा उकरून काढू नका, असा इशाराही तिने दिला. सोनाक्षीने मुकेश खन्ना यांना आठवण करून दिली की, वडिलांनी शिकवलेल्या संस्कारांमुळेच तिने आदरपूर्वक प्रतिसाद दिला होता. 'पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही माझ्या वडिलांनी मला शिकवलेल्या मूल्यांबद्दल काही सांगायचे ठरवाल तेव्हा कृपया लक्षात ठेवा की त्या मूल्यांमुळेच मी जे बोलले ते मी अत्यंत आदराने बोलले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.