मायकल जॅक्सन जगभरात पॉप स्टार म्हणून ओळखला जातो.
मायकल जॅक्सनचा सॉक्स विकला गेला आहे.
मायकल जॅक्सनच्या सॉक्सचा लिलाव करण्यात आला आहे.
मायकल जॅक्सन (Michael Jackson ) हा जगातील प्रसिद्ध पॉप स्टार होता. त्याला आजही 'किंग ऑफ पॉप'म्हणून ओळखले जाते. मायकल जॅक्सनची गाणी आणि डान्स आजही लोकांना वेड लावतो. तरुणाईमध्ये त्याची तुफान क्रेझ पाहायला मिळते. मायकल जॅक्सन आज या जगात नसला तर त्याची कला कायम लोकांच्या मनात आहे. अशात आता मायकल जॅक्सन संबंधित महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
मायकल जॅक्सनच्या वस्तूंचा लीलाव करण्यात आला. त्याच्या वस्तूंची लाखो-कोटींमध्ये बोली लावली गेली. नुकतीच एक माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मायकल जॅक्सनचा एक मळका मोजा तब्बल लाखो रुपयांत विकला गेला.
मायकल जॅक्सनने हे मोजे 1997 साली झालेल्या 'HIStory World Tour' दरम्यान फ्रान्स येथे परफॉर्म करताना मायकल जॅक्सनने वापरले होते. हा सॉक्स ऑफ-व्हाइट रंगाचा आहे. त्यावर राइनस्टोन देखील आहेत. सॉक्सवर काही ठिकाणी डाग देखील आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, मायकल जॅक्सनचे मोजे एका स्टेज टेक्निशियनला त्याच्या ड्रेसिंग रुम जवळ सापडले होते. हे सॉक्स अनेक वर्ष नीट जपून ठेवण्यात आले होते. मायकल जॅक्सनचे अवघे जग दिवाने आहे. तो एक प्रसिद्ध डान्सर आणि गायक होता. त्याने आपल्या कारकिर्दीत खूप यश मिळवले आहे. जगभरात त्याचे मोठे नाव आहे.
मायकल जॅक्सन जगभरात कशासाठी ओळखला जातो?
किंग ऑफ पॉप
मायकल जॅक्सनच्या मळक्या मोज्याची किंमत किती?
7 लाख
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.