
नितीन पाटणकर, साम टिव्ही
Phule movie controversy: महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारित ‘फुले’ हा बायोपिक सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटात प्रतीक गांधी महात्मा जोतिबा फुलेंची भूमिका साकारणार आहे. तर, पत्रलेखा सावित्रीबाईंची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरून काही संघटनांनी आक्षेप घेतला असून, त्यावर दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं.
अनंत महादेवन म्हणाले, "ट्रेलरवरून अनुमान लावू नका, संपूर्ण चित्रपट पाहा. त्यांनी सांगितलं की, चित्रपट पूर्णपणे बॅलन्स आहे, अनेक पुस्तकांचा अभ्यास केला आहे आणि कोणताही सीन कट करण्यात आलेला नाही. ओबीसी संघटनांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं होतं की, कोणताही सीन हटवू नका.
चित्रपटाला सेन्सर बोर्डाकडून U सर्टिफिकेट देण्यात आलं असून, केवळ काही बदल सुचवले गेले आणि ते मान्य करून केले गेले आहेत. त्यांनी यावरही भर दिला की, हा चित्रपट ब्राह्मणविरोधी नाही. उलट महात्मा फुले आणि ब्राह्मण समाज यांचं नातं "लव्ह स्टोरी"सारखं आहे, "हेट स्टोरी"सारखं नाही.
चित्रपटाची रिलीज डेट दोन आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आली असून, अनंत महादेवन म्हणाले की, "मी स्वतः ब्राह्मण आहे आणि मला अभिमान आहे. हा चित्रपट समाजाला फुलेंचा विचार समजावून सांगणारा आहे." मुळतः ११ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार असलेला 'फुले' हा चित्रपट आता दोन आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आला असून, नवीन प्रदर्शन तारीख २५ एप्रिल २०२५ निश्चित करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.