Shah Rukh Khan's Pathan Leaked in HD
Shah Rukh Khan's Pathan Leaked in HDSAAM TV

Pathaan Review: दमदार ॲक्शन, उत्तम VFX; ... असा आहे शाहरुख दीपिकाचा 'पठान'

'पठान' चित्रपटातील 'किंग खान'ने बॉक्स ऑफिसवर आपल्या दमदार स्वॅगमध्ये एन्ट्री केली आहे.
Pathaan Rating (3.5 / 5)

चित्रपट: पठान

कलाकार: शाहरुख खान, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा

दिग्दर्शक: सिद्धार्थ आनंद

स्टार्स: 3.5

Pathaan Review: बॉलिवूड अभिनेता किंग खानने तब्बल चार वर्षांनंतर रुपेरी पदड्यावर दमदार आगमन केले आहे. २०१८ मध्ये 'झिरो' चित्रपटात शाहरुख मुख्य भूमिकेत शेवटचा दिसला होता. आता 'पठान' चित्रपटातील 'किंग खान'ने बॉक्स ऑफिसवर आपल्या दमदार स्वॅगमध्ये एन्ट्री केली आहे.

दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानचा एकत्रित चौथा चित्रपट आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या स्पाय युनिव्हर्समध्ये जॉन अब्राहम खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे.

Shah Rukh Khan's Pathan Leaked in HD
Pathaan Controversy : 'पठान' सिनेमाविरोधात बजरंग दल आक्रमक; चित्रपटगृह चालकांना दिला 'हा' इशारा

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठान' चित्रपटाच्या कथेचा आवाका फारच मोठा आहे. या चित्रपटाची कथा भारतातून सुरु झाली असून रशिया, आफ्रिका, अफगाणिस्तान, पाकिस्तान अशा देशांमध्ये प्रवास करते. पाकिस्तानात 'मिशन रक्तबीज' नावाने भारताविरुद्ध जैविक युद्ध सुरू करण्याच्या विचारात असते.

हे युद्ध थांबवण्यासाठी पठान (शाहरुख खान) भारताचा शत्रू बनलेला जिम (जॉन अब्राहम) याच्याशी सामना करतो. यादरम्यान पठान आयएसआय एजंट रुबिना मोहसीन (दीपिका पदुकोण)ला कसा भेटतो आणि या मिशनमध्ये त्याला कोणत्या अडचणी येतात हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

या चित्रपटाचे मुख्य आकर्षण म्हणजे जॉन अब्राहम आणि शाहरुख खान यांच्यातील सामना. चित्रपटात जॉन अब्राहम हा दहशतवादी आहे, पण तो कसा दहशतवादी झाला यामागे एक रंजक कथा आहे.

Shah Rukh Khan's Pathan Leaked in HD
Bollywood Celebrity In Pathaan Review: चाहत्यांप्रमाणे बॉलिवूड सेलिब्रिटींनाही शाहरुखच्या 'पठान'ची भुरळ...

'पठान' चित्रपटाचे शूटिंग अनेक देशांमध्ये झाले आहे. जॉन अब्राहम आणि शाहरुख खान यांनी परदेशी लोकेशन्समध्ये फाईटिंग सीनमध्ये उत्तम परफॉर्मन्स दिला आहे. या दोघांवर चित्रित केलेले अॅक्शन सीक्वेन्स चाहत्यांचे मनोरंजन करणारे आहेत.

'बेशरम रंग..' हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून दीपिका पदुकोणच्या भगव्या रंगाच्या बिकिनीची चर्चा खूपच होती. दीपिका पदुकोणच्या भगव्या रंगाच्या बिकिनीत पठान सोबतचा रोमान्स चित्रपटातून काढण्यात आला आहे.

पण गाण्यात ती भगव्या रंगाची बिकिनी घातलेली दिसत आहे, मात्र या चित्रपटात ती फक्त बिकिनीमध्ये पोझ देण्यापुरती मर्यादित दिसत आहे. शाहरुख आणि जॉन अब्राहमप्रमाणेच दीपिकानेही दमदार अॅक्शन सीन्स दिले आहेत.

Shah Rukh Khan's Pathan Leaked in HD
King Is Back: शाहरुख- सलमान पुन्हा एकदा दिसणार एकत्र, 'पठान'मधील 'हा' सीन होतोय व्हायरल...

प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर कथा असलेला हा चित्रपट बराच प्रेक्षकांच्या पसंदीस उतरला आहे. अ‍ॅक्शनने असलेल्या या चित्रपटात शाहरुख खान स्टाईलमध्ये रोमान्स आणि कॉमेडी या दोन्ही गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.

'पठान'मध्ये शाहरुख खानची रोमँटिक हिरोची इमेज मोडीत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, पण तरीही शाहरुखच्या नावावरून रोमँटिक हिरोचा टॅग हटवणे केवळ अवघडच नाही तर अशक्य आहे. त्यामुळे चित्रपटातही रोमान्स दाखवण्यात आला आहे.

Shah Rukh Khan's Pathan Leaked in HD
Pathaan Leaked in HD: या ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर लीक झाला शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित 'पठान'

दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने 'पठान' चित्रपटात अॅक्शनला अधिक महत्त्व दिले आहे. कोट्यावधींच्या बजेटमध्ये सर्व फाईट सीन्स भव्यपणे शूट करण्यात आले आहेत, पण कथेत अनेक ठिकाणी लॉजिक दिसत नाही. या चित्रपटाने सिनेमॅटोग्राफी, व्हीएफएक्स यासह कोणत्याही विभागात कोणतीही तडजोड केलेली नाही.

मात्र शाहरुख खानचा हा पहिलाच चित्रपट आहे, ज्यात केवळ 2 गाणी आहेत. बेशरम रंगाबाबत वाद झाला, त्यामुळे हे गाणे प्रसिद्धीझोतात आले, पण दुसरे गाणे झूम जे पठाण लोकांच्या जिभेवर चढू शकले नाही. चित्रपटाचा संपूर्ण यूएसपी केवळ अॅक्शनपुरता मर्यादित आहे.

Shah Rukh Khan's Pathan Leaked in HD
Shah Rukh Khan: चाहत्यानं शाहरुखला विचारली अपूर्ण इच्छा, किंग खाननं दिलं 'हे' उत्तर...

'पठान' चित्रपटात असा एक सीन आहे, जो पाहून सलमान खानचे चाहते खूश होतील.यामध्ये सलमानचा कॅमिओ एका टप्प्यावर चित्रपटाला पुढच्या पातळीवर घेऊन जातो. जर तुम्ही शाहरुख खानचे चाहते असाल, तुम्हाला अॅक्शन चित्रपट आवडत असतील तर हा चित्रपट फक्त तुमच्यासाठी आहे. हा असा मसाला बॉलिवूड चित्रपट आहे, जो चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये पाहणे आणि आनंद घेण्यासाठी आवडतो.

Shah Rukh Khan's Pathan Leaked in HD
Kangana Ranaut: दीड वर्षांनंतर कंगनाची ट्विटरवर वापसी; पहिल्या ट्वीटमध्ये म्हटलं...

'पठान' चित्रपटात असा एक सीन आहे, जो पाहून सलमान खानचे चाहते खूश होतील.यामध्ये सलमानचा कॅमिओ एका टप्प्यावर चित्रपटाला पुढच्या पातळीवर घेऊन जातो. जर तुम्ही शाहरुख खानचे चाहते असाल, तुम्हाला अॅक्शन चित्रपट आवडत असतील तर हा चित्रपट फक्त तुमच्यासाठी आहे. हा असा मसाला बॉलिवूड चित्रपट आहे, जो चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये पाहणे आणि आनंद घेण्यासाठी आवडतो.

Shah Rukh Khan's Pathan Leaked in HD
Oscar Shortlists 2023: भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, 'या' दोन चित्रपटांना ऑस्कर नॉमिनेशन...

चित्रपटात अशी अनेक दृश्ये आहेत ती फारच वेगळी दिसतात.. अशी काही शस्त्रे लढाईसाठी वापरली गेली आहेत, जी खेळण्यांसारखी दिसतात. याशिवाय अनेकवेळा चित्रपटात अ‍ॅक्शनचा अतिरेक झाल्याचे दिसून येतो. ज्या प्रेक्षकांना अ‍ॅक्शन आवडत नाही, त्यांना अशा सीन्सचा नक्कीच कंटाळा येईल. जर तुम्हाला चित्रपटात लॉजिक दिसत असेल आणि तुम्हाला अॅक्शन आवडत नसेल तर हा चित्रपट तुमच्यासाठी नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com