ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट (Movies) आणि वेबसीरीज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यंदाच्या आठवड्यामध्ये (१५ जानेवारी ते २१ जानेवारी) प्रेक्षकांच्या भेटीला अनेक चांगले चित्रपट आणि वेबसीरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक वेगवेगळ्या आशयांचे चित्रपट रिलीज होणार आहेत. चला तर जाणून घेऊया, या आठवड्यात रिलीज होणार्या चित्रपट आणि वेब सीरिजबद्दल...
रोहित शेट्टी दिग्दर्शित 'इंडियन पोलिस फोर्स' या वेबसीरीजमध्ये, सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ओबेरॉय आणि शिल्पा शेट्टी यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही वेबसीरीज 'अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ' १९ जानेवारी २०२४ रोजी रिलीज होईल.
'एक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅन' या चित्रपटाचे कथानक अभी मुलाभोवती फिरते, त्या मुलाला लहानपणापासूनच अभिनयाची फार आवड असते. मोठा झाल्यावर तो ज्युनियर आर्टिस्ट बनतो आणि जेव्हा तो एका कंपनीच्या एमडी लिकिताच्या प्रेमात पडतो.
पुढे काय घडते? हे पाहण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा हा चित्रपट बघावा लागेल. हा चित्रपट येत्या १९ जानेवारी २०२४ रोजी 'डिज्ने प्लस हॉटस्टार' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये नितीन, रोहिणी, श्री लीला, राव रमेश, सुदेव नायर आणि राजशेखर यांच्या भूमिका आहेत.
'जो' चित्रपटाचे कथानक एका तरुणाभोवती फिरते, जो कॉलेजमध्ये असताना प्रेमात पडतो, पण त्यांचे नाते काही कारणामुळे तुटते. रिओ राज, मालविका मनोज आणि भव्य त्रिखा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १५ जानेवारी २०२४ रोजी 'नेटफ्लिक्स' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
'हॅझबिन हॉटेल' ही एक अॅनिमेटेड सीरिज आहे, जी लुसिफरच्या मुलीभोवती फिरते. ही सीरिज १९ जानेवारी २०२४ रोजी 'अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ'वर होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.