Mai Atal Hoo Trailer 2: पंकज त्रिपाठीच्या 'मैं अटल हूं'चा दुसरा ट्रेलर रिलीज, राम मंदिर बांधण्यासाठी वाजपेयींचा अटल संकल्प

Pankaj Tripathi Movie: या चित्रपटाच्या दुसर्‍या ट्रेलरमध्ये विचारधारेमुळे पक्षावर कोणते आरोप झाले आणि त्या आरोपांमुळे अटलबिहारी वाजपेयींना कोणत्या त्रासाला सामोरे जावे लागले हे दाखवण्यात आले आहे.
Mai Atal Hoo Trailer 2
Mai Atal Hoo Trailer 2Saam Tv
Published On

Mai Atal Hoo Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्या आगामी 'मैं अटल हूं' या चित्रपटाचा (Mai Atal Hoo Movie) दुसरा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट १९ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या दुसर्‍या ट्रेलरमध्ये विचारधारेमुळे पक्षावर कोणते आरोप झाले आणि त्या आरोपांमुळे अटलबिहारी वाजपेयींना कोणत्या त्रासाला सामोरे जावे लागले हे दाखवण्यात आले आहे.

'मैं अटल हूं' चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, अटलबिहारी वाजपेयी यांच्या पक्षावर अनेक आरोप करण्यात आले. पक्षावर आरोप झाल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी खूपच दु:खी होतात. ट्रेलरमध्ये पंकज त्रिपाठी माजी पंतप्रधानांच्या व्यक्तिरेखेला पूर्ण न्याय देताना दिसत आहेत. या ट्रेलरमध्ये राम मंदिर आंदोलन आणि पोखरण अणुचाचणीची झलकही दाखवण्यात आली आहे.

ट्रेलरची सुरुवात एका दृश्याने होते ज्यामध्ये अटल बिहारी बाजपेयी चित्रपट, आनंद आणि समृद्धीबद्दल बोलताना दिसत आहेत. ते असे म्हणतात की, 'आपण ज्या सुख-समृद्धीची कल्पना करतो. त्याला सिनेमावाले दाखवतात. आम्ही ते स्वीकारतो. असाच एक पडदा चित्रपटगृहांच्या बाहेरचा आहे. जो या देशातील निष्पाप नागरिकांच्या डोळ्यांसमोर ठेवला जातो. तुम्ही त्यांना जे काही दाखवाल ते सत्य स्वीकारतात.

यानंतर अचानक महात्मा गांधींच्या हत्येची बातमी येते, 'अटल बाबू, गोडसे नावाच्या व्यक्तीने बापूंची हत्या केली'. गोडसेही काही काळ संघात असल्याची बातमी सगळीकडे पसरली होती. पक्षाला लागलेला हा डाग आणि माजी पंतप्रधानांचा त्रास शानदार अंदाजमध्ये टिपण्यात आला आहे.

Mai Atal Hoo Trailer 2
Mukkam Post Adgaon: पुरुषोत्तम बेर्डे यांचा गावरान तडका, 'मुक्काम पोस्ट आडगाव' २४ जानेवारीला नाट्यप्रेमींच्या भेटीला

ट्रेलरमध्ये पंकज त्रिपाठी पूर्णपणे अटलबिहारी बाजपेयींच्या भूमिकेत आला आहे. भाषा, वेशभूषा, लूक आणि बोलण्याची शैली हुबेहुब अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखी आहे. या अभिनेत्याने माजी पंतप्रधानांचे प्रत्येक पैलू पडद्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने मांडले आहेत. त्याच शैलीत ते प्रभावी भाषण करताना दिसले आहेत. ए

पीजे अब्दुल कलाम यांनी पोखरण अणुचाचणीच्या यशाबद्दल अटलबिहारी वाजपेयी यांचे अभिनंदन केले आणि अणुबॉम्बला काय उत्तर आहे याचे उत्तर देशाला मिळाले ते दृश्यही ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. अटलबिहारी यांच्या कार्यकाळात दिल्ली ते लाहोर या बससेवेसह इतर अनेक गोष्टींसह मंदिरासाठीचे आंदोलन हेदेखील ठळकपणे दिसून येत आहे. दरम्यान, सध्या 'मैं अटल हूं' या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. १९ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Mai Atal Hoo Trailer 2
Shivali Parab: शिवाली हे खरं आहे का?, अभिनेत्रीचा 'त्या' व्यक्तीसोबतचा फोटो पाहून चाहत्यांना पडलाय प्रश्न

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com