Mukkam Post Adgaon: पुरुषोत्तम बेर्डे यांचा गावरान तडका, 'मुक्काम पोस्ट आडगाव' २४ जानेवारीला नाट्यप्रेमींच्या भेटीला

Mukkam Post Adgaon Natak: मुक्काम पोस्ट आडगाव' (Mukkam Post Adgaon Natak) असं या नाटकाचे नाव असून हे नाटक येत्या २४ जानेवारीपासून नाट्यगृहात येत आहे. त्यामुळे यावेळी हे नाटक नाट्यप्रेमींसाठी जबरदस्त मेजवाणी असणार आहे. सध्या नाट्यप्रेमी या नाटकाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Mukkam Post Adgaon Natak
Mukkam Post Adgaon NatakSaam Tv
Published On

Purushottam Berde:

नाट्यप्रेमींच्या मनोरंजनासाठी नवनवीन नाटकं भेटीला येत आहेत. आता आणखी एक नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मुक्काम पोस्ट आडगाव' (Mukkam Post Adgaon Natak) असं या नाटकाचे नाव असून हे नाटक येत्या २४ जानेवारीपासून नाट्यगृहात येत आहे. त्यामुळे यावेळी हे नाटक नाट्यप्रेमींसाठी जबरदस्त मेजवाणी असणार आहे. सध्या नाट्यप्रेमी या नाटकाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

पुरुषोत्तम बेर्डे हे नाव उच्चारलं की वैविध्यपूर्ण, नाविन्यपूर्ण काहीतरी असणार याची खात्री असते. रसिक प्रेक्षकांची नाडी नेमकी ओळखणाऱ्या पुरुषोत्तम बेर्डे यांची प्रत्येक कलाकृती आकर्षक आणि बहारदार असते यात शंका नाही. लवकरच ते रंगमंचावर एक जबरदस्त गावरान तडका घेऊन येत आहेत. त्यांच्या 'मुक्काम पोस्ट आडगाव' या नव्या नाटकाचा शुभारंभ २४ जानेवारीला दुपारी ४ वाजता यशवंत नाट्यगृहात होणार आहे.

Mukkam Post Adgaon Natak
Bahirji Motion Poster: जगातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेराची यशोगाथा सांगणार 'बहिर्जी'

अष्टविनायक प्रकाशित, स्नेहा प्रदीप प्रोडक्शन्स आणि अकॅडमी ऑफ सिनेमा अँड थिएटर निर्मित पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित या नाटकाद्वारे पुन्हा एकदा मराठी व्यावसायिक रंगभूमीवर नवीन अभिनेते, अभिनेत्री, गायक, नर्तक आणि वादक पदार्पण करणार आहेत. 'रिव्ह्यू' या नाट्यप्रकारांत मोडणाऱ्या फॉर्ममध्ये निर्माता, संगीतकार, नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार, वेशभूषाकार आणि दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी हे नाटक २५ कलावंत तंत्रज्ञाच्या ताफ्यात उभे केले आहे.

Mukkam Post Adgaon Natak
Fighter Star Cast Fees: 'फायटर'साठी हृतिक रोशनने घेतलं तगडं मानधन, इतर कलाकारांची फी किती?

मराठवाड्यातील मूळ आडगाव मधून येऊन औरंगाबाद, पुणे, मुंबईनंतर संपूर्ण जग फिरलेले प्रदीप आडगावकर यांच्या आत्मनिवेदनातून अत्यंत नाविन्यपूर्ण असा नाट्याविष्कार पुरुषोत्तम बेर्डे मराठी रंगभूमीवर सादर करत आहेत. हा सर्व नाट्यप्रकार संगीत, नाट्य, नृत्य आणि गीतांच्या माध्यमातून पुढे जातो. 'मुक्काम पोस्ट आडगाव' हा नाट्यप्रयोग भव्य-दिव्य असा दृष्टी सौख्याचा आनंद देणारा असेल असा विश्वास दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे व्यक्त करतात.

Mukkam Post Adgaon Natak
Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला समर्थ जुरेल, ढसाढसा रडली ईशा मालवीय; VIDEO व्हायरल

'मुक्काम पोस्ट आडगाव' हे नाटक म्हणजे मराठवाड्यातल्या एका खेडेगावातून मुंबई पुण्यात शिकून एका मोठ्या फार्मासिटिकल कंपनीच्या सीईओ पदापर्यंत पोहोचलेल्या अत्यंत सुशिक्षित आणि सुसंस्कृत अशा एका मूळच्या शेतकरीपुत्राची गोष्ट आहे. ज्याच्या नसानसात मराठवाड्याची भाषा, संस्कृती, लोककला, साहित्य, कविता, संतकाव्य आणि तिथल्या खेड्यापाड्यातल्या रूढी प्रथा ठासून भरलेल्या आहेत. असा हा शेतकरीपुत्र अनेक वर्षांनी मराठवाड्यातल्या आपल्या आडगाव या खेडयात जातो आणि तिथलं बदलत चाललेलं लोकजीवन आणि संस्कृती पाहून आपल्या गतकाळाच्या तुलनेने अस्वस्थ होतो आणि गतकाळातल्या समृद्धीचे मोठ्या रसिकतेने आणि रसभरीत भाषेने पुनःप्रत्ययाचा आनंद रसिकांनाही देतो आणि स्वत:ही अनुभवतो.

Mukkam Post Adgaon Natak
Anil Kapoor: 'फायटर'ने अनिल कपूरला काय शिकवलं?, म्हणाला - 'हा एक अभूतपूर्व प्रवास...'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com