जर तुम्ही सिनेमाप्रेमी असाल तर ऑगस्ट महिन्याचा हा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी पर्वणीच ठरेल. हा शेवटचा आठवडा धमाकेदार असणार आहे. कारण 26 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत ZEE5, नेटफ्लिक्स (Netflix), जिओ सिनेमा (Jio Cinema) या OTT प्लॅटफॉर्मवर 7 चित्रपट आणि वेब सीरीज रिलीज होणार आहेत. कोणते आहेत हे चित्रपट आणि सीरीज, जाणून घेऊ...
इंट्रोगेशन : तुम्ही जर थ्रिलर चित्रपटांचे चाहते असाल तर 'इंट्रोगेशन' ही मर्डर मिस्ट्री थ्रिलर सीरीज तुम्हाला नक्की पाहता येईल. येत्या 30 ऑगस्टला ZEE5 वर ही सीरीज स्ट्रीम होणार आहे. एका सेवानिवृत्त जजचा रहस्यमय मृत्यू आणि त्याच्या मृत्यूच्या तपासादरम्यान उलगडणारी एक-एक वळण याविषयी ही सीरीज आहे.
बडी : 30 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर 'बडी' हा भयपट तुमच्या भेटीला येतोय. ज्यात एअर ट्राफिक कंट्रोल अधिकारी असलेली एक महिला अपघातानंतर कोमात जाते. या महिलेचा आत्मा एका खेळण्यात जातो आणि हे खेळणं एका मुलाच्या घरी पोहोचतं. याविषयी ही सगळी कथा आहे.
आईसी 814 कंदहार हायजॅक : 1999 सालचा 24 डिसेंबर हा दिवस आजही भारताच्या आणि जगाच्याही चांगलाच लक्षात आहे. कारण आईसी 814 हे भारतीय विमान हायजॅक करण्यात आलं होतं. या प्लेन हायजॅकच्या घटनेवर 'आईसी 814: कंदहार हायजॅक' ही वेब सीरिज 29 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. अभिनेता विजय वर्मा, ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह, अभिनेत्री दिया मिर्झा तसंच पंकज कपूर यात लीड रोल्समध्ये आहेत अभिनेता विजय वर्मा हा आईसी 814 चा पायलट कॅप्टन शरण देवची भूमिका साकारतोय.
कॅडेट्स: 30 ऑगस्टला जिओ सिनेमावर 'कॅडेट्स' रिलीज होतोय. कारगिल युद्धआधी 4 प्रशिक्षणार्थी तरुण सशस्त्र दल अकादमी दाखल होतात. 1998 चा काळ यात दाखवला गेला आहे.
'द रिंग्स ऑफ पावर' आणि 'गॉडजिला एक्स कॉन्ग'
29 ऑगस्टला अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर द रिंग्स ऑफ पावर स्ट्रीम केला जाणार आहे. 'गॉडजिला वर्सेज कांग' नंतर आता मॉन्स्टरवर्स 'गॉडजिला एक्स काँग' या नवीन सीझनसह परत आला आहे. जियो सिनेमावर तुम्ही हा नवा सीझन पाहू शकता.
मुर्शिद : अष्टपैलू अभिनेता के के मेनन आपल्याला 30 ऑगस्टला येणाऱ्या 'मुर्शिद' या सीरीजमध्ये दिसणार आहे. ZEE 5 ही सीरीज तुम्हाला पाहता येईल. ही एक गैंगस्टर थ्रिलर सीरीज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.