Virat Kohli Special Post For Anushka
Virat Kohli Special Post For AnushkaInstagram @anushkasharma

Anushka Sharma Turns 35: तू माझे सर्वस्व आहेस... अनुष्काच्या वाढदिवशी विराटची खास पोस्ट

Virat Kohli Special Post For Anushka: विराटने अनुष्काचे काही फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Published on

Anushka Sharma Birthday: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा आज वाढदिवस आहे. अनुष्का आज ३५ वर्षाची झाली आहे. अनुष्का शर्माचा जन्म १ मे, १९८८ साली झाला. अनुष्का तिच्या वाढदिवशी विराट कोहलीने खास शुभेच्छा दिल्या आहेत.

विराटने अनुष्काचे काही फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अनुष्काचे हे फोटो विविध ठिकाणचे आणि वेगवेगळ्या मूडमधले आहेत. अनुष्काचे हे गोड फोटो शेअर करत विराटने या फोटोंना सुंदर कॅप्शन देखील दिले आहे.

Virat Kohli Special Post For Anushka
Shreyas Talpade At Hutatma Chowk: तू आहेस म्हणून मी आहे… श्रेयस तळपदेने महाराष्ट्रदिनी व्यक्त केली भावना

'तुझ्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींवर आणि तुझ्या सर्व गोंडस वेडेपणा तुझ्यावर अपार प्रेम करतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा, तू माझे सर्वस्व आहेस .' असे कॅप्शन शेअर करत हार्ट ईमोजी शेअर केले आहेत. तसेच विराटच्या या पोस्टवर अनुष्काने देखील कमेंट केली आहे. तिने अमर्याद प्रेम असे सिम्बॉलचं माध्यमातून लिहिले आहे.

विराटच्या या पोस्टवर अनेक नेटकरी आणि सेलिब्रिटी कमेंटकरून अनुष्काला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

विराट आणि अनुष्का यांचे लग्न इटली येथे ११ डिसेंबर, २०१७ रोजी खूप जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडेल. त्यानंतर त्यांनी दिल्ली आणि मुंबई येथे रिसेप्शन दिले होते. (Latest Entertainment News)

विराट-अनुष्का यांची पहिली भेट खूपच इंटरेस्टिंग होती. २०१३ मध्ये दोघे इह जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान भेटले. विराट कोहलीने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा तो अनुष्काला पहिल्यांदा भेटला होता तेव्हा तो खूप घाबरलेला होता. त्यानंतर भीती बाजूला सारत अनुष्काशी बोलताना त्याने एक जोक केला.

खरं तर, अॅड शूटच्या वेळी अनुष्का विराटपेक्षा उंच दिसत होती, त्यामुळे विराट म्हणाला, "तुम्ही खूप हाय हिल्स घातले आहेत असं वाटत नाही. विराट कोहलीचे हे बोलणे ऐकून अनुष्का शर्माला राग आला आणि ती म्हणाली, "म्हणजे." अनुष्काच्या अशा प्रतिक्रियेनंतर एक विचित्र शांतता निर्माण झाली. मात्र, नंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com