CBFC Decision On OMG 2 : प्रदर्शनाआधीच अक्षयचा ‘OMG2’ सेन्सॉरच्या कात्रीत, बोर्डाने सूचवलेल्या बदलांवर निर्माते नाराज

OMG 2 News: ‘ओएमजी २’ला सेन्सॉर बॉर्डाने सर्टिफिकेट देण्यापूर्वी चित्रपट रिव्हाईजिंग कमिटीकडे पाठवला होता. त्या कमिटीने निर्मात्यांना काही बदल सुचवले आहेत.
CBFC Decision On OMG 2
CBFC Decision On OMG 2Saam TV
Published On

OMG 2 Latest News: अमित राय दिग्दर्शित ‘ओएमजी २’ येत्या ११ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पण अद्याप या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून सर्टिफिकेट मिळालेले नाही. अद्याप हा चित्रपट सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनमध्येच अडकला आहे.

‘ओएमजी २’ला सेन्सॉर बॉर्डाने सर्टिफिकेट देण्यापूर्वी हा चित्रपट रिव्हाईजिंग कमिटीकडे पाठवला होता. त्या कमिटीने अक्षय कुमारच्या ‘ओएमजी २’ या चित्रपटात तब्बल २० कट्स सुचवले आहेत. आणि बोर्डाने चित्रपटाला A सर्टिफिकेट देण्याची सूचना निर्मात्यांना दिली आहे.

CBFC Decision On OMG 2
Kangana Ranaut - Javed Akhtar Controversy : जावेद अख्तर यांच्या अडचणीत वाढ, कोर्टाने बजावलं समन्स; काय आहे प्रकरण?

सेन्सॉर बोर्डाप्रमाणेच सेन्सॉरच्या रिव्हाईजिंग कमिटीनेही चित्रपटाला नकार दिला आहे. सेन्सॉर बोर्डाने दिलेले सर्व बदल झाल्यानंतरच चित्रपटाला सर्टिफिकेट दिले जाऊ शकते. परंतु चित्रपट निर्मात्यांना CBFC ने सुचवलेले बदल आणि रिव्हाईजिंग कमिटीचे चित्रपटाला ‘A’ प्रमाणपत्र देण्याबाबत बोलणं चित्रपटाच्या निर्मात्यांना पटलेलं नाही. या संदर्भात चित्रपटाच्या निर्मात्यांना लवकरच सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन त्यांचे म्हणणे मांडायचे असल्याची माहिती सुत्रांनी दिली. (Bollywood Film)

रिव्हाईजिंग कमिटीने चित्रपटाला ए सर्टिफिकेट देण्याच्या निर्णयामुळे अक्षय कुमार सह निर्मात्यांचे टेन्शन वाढले आहे. अद्याप मेकर्सला 'शो कॉज' नोटीस मिळालेली नाही. चित्रपटप्रदर्शनासाठी खूप कमी दिवस राहिले असून अशातच या चित्रपटाच्या प्रदर्शानाची तारीख पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे. जर चित्रपटाला वेळेतच सर्टिफिकेट मिळाले तर अक्षयचा ‘ओएमजी २’ आणि सनी देओलचा ‘गदर २’ एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर भिडणार आहेत. ११ ऑगस्ट हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

CBFC Decision On OMG 2
Gadar 2 Trailer Out: २२ वर्षांनंतरही ‘गदर’ची क्रेझ कायम, सनी देओलच्या ‘गदर २’चा ट्रेलर प्रदर्शित; दिसणार ॲक्शन आणि दमदार संवादांचा जलवा

अक्षय कुमार स्टारर ‘OMG 2’ चित्रपटाची कथा केवळ धर्म आणि श्रद्धेवर आधारित नसून चित्रपटाचा मूळ विषय हा लैंगिक शिक्षण आहे. अशा परिस्थितीत धर्म आणि लैंगिक शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर बनलेल्या या चित्रपटाबाबत सेन्सॉर बोर्ड गांभीर्याने विचार करीत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता, टीझरमधील काही दृश्यांवर नेटकऱ्यांनी टीका केली होती. नेटकऱ्यांनी टीका केलेल्या सीनमध्ये, रेल्वेच्या पाण्यानं अक्षयचा अभिषेक केला जात आहे. ‘OMG 2’ चित्रपटामध्ये अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतमने प्रमुख भूमिका साकारली. गेल्या काही दिवसापूर्वी चित्रपटातील ‘ऊंची ऊंची वादी’ (Oonchi Oonchi Waadi) हे गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित झालं होतं. गाण्याला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला असून चित्रपटाचा टीझर देखील प्रेक्षकांना फारच भावलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com