Kangana Ranaut - Javed Akhtar Controversy : जावेद अख्तर यांच्या अडचणीत वाढ, कोर्टाने बजावलं समन्स; काय आहे प्रकरण?

Javed Akhtar Samans : कंगनाने जावेद अख्तर यांच्यावर खंडणी आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
Javed Akhtar and Kangana Ranaut Controversy
Javed Akhtar and Kangana Ranaut Controversy Saam TV

Kangana Ranaut Allegation On Javed Akhtar : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने गीतकार जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत कंगनाने जावेद अख्तर यांच्यावर खंडणी आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे. तर आता या प्रकरणावर मुंबई कोर्टाने जावेद अख्तर यांना समन बजावले आहे.

कोर्टाने स्पष्ट केले आहे की, जावेद अख्तर यांच्याविरोधात खंडणीचा कोणतेही गुन्हा दाखल झालेला नाही. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट (अंधेरी कोर्ट) आर. एम. शेक यांनी २५ जुलैला जावेद अख्तर यांच्याविरोधात समन बजावत त्यांना ५ ऑगस्टला कोर्टात हजार राहण्यास सांगितले आहे.

Javed Akhtar and Kangana Ranaut Controversy
HBD Kriti Sanon : अभिनेत्री ते बिजनेस वुमन.. क्रिती सेनन कोट्यावधींची मालकीण; चित्रपटापेक्षा जाहिरातीसाठी घेते जास्त मानधन

कंगना रनौतने जावेद अख्तर यांच्याविरोधातील तक्रारीत म्हटले आहे की, जावेद अख्तर आणि त्यांचा एक सहकारीशी (हृतिक रोशन) झालेल्या वादानंतर त्यांनी कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेलला वाईट हेतूने घरी बोलावले आणि त्यांना धमकी दिली.

जावेद अख्तर आणि कंगना यांच्यातील वाद नवीन नसून खूप कलाकपासून सुरू आहे. या वादाचे पुढे काय होणार हे ५ ऑगस्टला कळेल.

अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना यांच्यातील वादावरून कंगनाने केलेल्या आरोपांवर देखील जावेद अख्तर यांनी आपलं म्हणणं मांडलं होत. यावर ते म्हणाले की, "जेव्हा कंगना आणि ऋतीक या दोघांमध्ये वाद सुरू होते तेव्हा त्यांना समजवण्याचा मी सर्वोतोपरी प्रयत्न केला. मात्र कंगनाने यात मलाच दोषी ठरवले.

सुशांतच्या आत्महत्येवरूनही कंगनाने जावेद यांच्यावर आरोप केले होते. सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेकांनी बॉलिवूडमधील परिस्थितीवर भाष्य केलं होतं. तसेच अनेक दिग्गज मोठ्या हस्तींची नावे घेत बॉयकॉट बॉलिवूड करण्यात आले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com