O Romeo Collection : टीम इंडियाचा विजय शाहिद-तृप्तीला पडला महागात, नेमकं काय घडलं?

O Romeo Box Office Collection Day 3 : शाहिद कपूरचा 'ओ रोमिओ' चित्रपट रिलीज होऊन तीन दिवस झाले आहेत. तिसऱ्या दिवशी कमाईत घसरण झाली आहे. संडे कलेक्शन जाणून घेऊयात.
O Romeo Box Office Collection Day 3
O Romeo Collection saam tv
Published On
Summary

'ओ रोमिओ' चित्रपट 13 फेब्रुवारी 2026 ला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

रविवारी IND-PAK मॅच होती. ज्यात भारताने विजय मिळवला.

रविवारी 'ओ रोमिओ' चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घसरण झाली.

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या 'ओ रोमिओ' (O ROMEO) चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यापासून बंपर कमाई केली आहे. व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर 'ओ रोमिओ' रिलीज झाला. 'ओ रोमिओ' चित्रपट 13 फेब्रुवारी 2026 ला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरीची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. चित्रपट अ‍ॅक्शन-थ्रिलर आणि रोमँटिक चित्रपट आहे. काल इंडिया- पाकिस्तान मॅच होती. त्यामुळे प्रेक्षक मॅचसाठी खूपच उत्सुक होते. इंडियाने या मॅचमध्ये विजय मिळवला आहे. इंडिया- पाकिस्तान मॅचचा 'ओ रोमिओ' च्या कलेक्शनवर थोडा परिणाम झाल्याचे दिसून येते.

'ओ रोमियो' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 3

'ओ रोमियो' चित्रपटाने व्हॅलेंटाईन डे खूप कमाई केली. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी 8.50 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 12.65 कोटी रुपये कमावले आहेत. तर चित्रपटाने रविवारी म्हणजे तिसऱ्या दिवशी 9.00 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. रविवार असूनही चित्रटाच्या कलेक्शनमध्ये घट पाहायला मिळत आहे.

  • पहिला दिवस - 8.50 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 12.65 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 9.00 कोटी रुपये

  • एकूण - 30.15 कोटी रुपये

'ओ रोमियो' शाहिदच्या टॉप 10 चित्रपटांमध्ये येऊ शकेल का?

'ओ रोमियो' रिलीज होऊन तीन दिवस झाले आहेत तरीही 'ओ रोमियो' शाहिदच्या टॉप 10 चित्रपटांमध्ये स्थान मिळवू शकला नाही. मीडिया रिपोर्टनुसार, 'बदमाश कंपनी' हा शाहिदच्या कारकिर्दीतील 10 वा सर्वात मोठा चित्रपट आहे. सोमवारी 'ओ रोमियो' शाहिदच्या टॉप 10 चित्रपटांमध्ये सामील होईल अशी अपेक्षा आहे.

मीडिया रिपोर्टनुसार,'ओ रोमियो' चित्रपटाचे बजेट जवळपास 120-150 कोटी रुपये आहे. 'ओ रोमियो' चित्रपटात शाहिद कपूर, तृप्ती डिमरीसोबतच नाना पाटेकर , रणदीप हुडा , दिशा पटानी हे कलाकार देखील झळकले आहेत. 'ओ रोमियो' चे निर्माते विशाल भारद्वाज आहेत.'ओ रोमियो' चित्रपट आता लवकरच 50 कोटींचा टप्पा पार करणार आहे.

O Romeo Box Office Collection Day 3
Bigg Boss Marathi 6 : करण सोनावणेच्या घराबाहेर जाण्याने प्राजक्ता भावुक, घट्ट मिठी मारली अन्..., पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com