Nikki-Varsha Fight
Bigg Boss MarathiSAAM TV

Bigg Boss Marathi : निक्की- वर्षा ताईमध्ये पुन्हा कडाक्याचे भांडण, नेमकं झालं काय, कुणी सुरु केला वाद?

Nikki-Varsha Fight : वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळीमध्ये पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. नवीन वादाचा विषय जाणून घ्या.
Published on

'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) मध्ये रोज एक राडा पाहायला मिळत आहे. येथे गेम खेळण्यासोबतच वारंवार भांडणे केली जात आहेत. नुकताच घरात नॉमिनेशन टास्क पार पडला आहे. त्यामुळे घरातील वातावरण बिघडलेले पाहायला मिळाले आहे. या आठवड्यात एकूण ८ सदस्या नॉमिनेट झाले आहेत. या यादीत निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, वैभव चव्हाण, अंकिता वालावलकर, वर्षा उसगांवकर, आर्या जाधव यांचा समावेश आहे. या आठवड्यात कोण घराबाहेर पडणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

'बिग बॉस मराठी' चा नुकताच नवीन प्रोमो समोर आला आहे. यात निक्की आणि वर्षा उसगांवकर यांच्यात भांडण झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी जेवणाच्या धासधुसीवरून हे भांडण घरात रंगले आहे. निक्की (Nikki Tamboli) आणि वर्षा उसगांवकरांमध्ये भाजीवरून नवीन वाद पाहायला मिळत आहे.

वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांनी खराब झालेली भाजी टाकल्यामुळे निक्की त्यांच्याशी वाद घालताना दिसत आहे. निक्की म्हणते, "लोकांना अन्न मिळत नाही आणि तुम्ही भाज्या फेकताय" त्यावर वर्षा उसगांवकर म्हणतात की, "ती भाजी खराब आहे" यावर निक्की त्यांना "तुम्ही किती घाण स्वभावाच्या आहात ते दिसलंय आता" असे बोलते. तसेच शेवटी निक्की रागात वर्षा उसगांवकर यांना म्हणते की, "येथे उभ राहून बोंबाबोंब ठणाणा करू नका." ही नॉमिनेशनची चिडचिड आहे, असे सर्वत्र बोले जात आहे.

या व्हिडीओवर अनेक कमेंट्स पाहायला मिळाल्या आहेत. अनेकांनी निक्कीला ट्रोल केले आहे. एका युजरने लिहिलं की, "नॉमिनेशनमध्ये आल्यावर हिची फडफड सुरू होत." अजून बिग बॉस घरात किती वाद पाहायला मिळणार आहे. याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

Nikki-Varsha Fight
Big Boss Marathi 5 : बिग बॉसच्या घरामध्ये पुन्हा राडा; ६ सदस्य नॉमिनेट, कुणाचा पत्ता कट होणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com