Nikhil Bane : फायनली ती माझ्या आयुष्यात आली; हास्यजत्रा फेम अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

Hasya Jatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेने स्वप्नातील Triumph Scrambler 400 बाईक खरेदी केली आहे. या खास क्षणाचे फोटोशूट त्याने सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांचा आनंद द्विगुणित केला.
Nikhil Bane new bike Triumph Scrambler news
Nikhil Bane new bike Triumph Scrambler newsgoogle
Published On
Summary
  • निखिल बनेने Triumph Scrambler XC 400 ही स्वप्नातील बाईक खरेदी केली.

  • सोशल मीडियावर “फायनली ती आली” अशी खास पोस्ट शेअर केली.

  • सहकलाकार आणि चाहत्यांकडून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव झाला.

  • ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मुळे निखिलला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

लोकांना मनोरंजनाची आयुष्यात नितांत गरज असते. गेले अनेक वर्षे मनोरंजन क्षेत्र त्यासाठी काम करत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात चांगलेच गाजणार कॉमेडी शोचा समावेश असतो. त्यातीलच महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता निखिल बने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण, त्याने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये निखिलने फायनली 'ती' आली अशी पोस्ट शेअर केली आहे. निखिलचा हा आनंद कसला आहे? हा प्रश्न अनेक चाहत्यांना पडलेला आहे.

निखिलच्या आयुष्यात फायनली 'ती' आली असून यामुळे तो खूप आनंदात आहे. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की, ही ‘ती’ नेमकी कोण? यावर चाहत्यांची उत्सुकता दूर करत निखिलने सांगितलं की, ही 'ती' दुसरी कोणी नसून त्याची नवीकोरी स्वप्नातील बाईक आहे. निखिलला अनेक दिवसांपासून स्वतःसाठी ड्रीम बाईक घ्यायची इच्छा होती. अखेर त्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. त्याने Triumph Scrambler XC 400 ही आकर्षक बाईक खरेदी केली आहे. या बाईकसोबतचे खास फोटोशूटही त्याने सोशल मीडियावर शेअर केलं आहे. बाईक खरेदी करताना त्याचे कुटुंबीय आणि जवळचे मित्रही त्याच्यासोबत होते.

Nikhil Bane new bike Triumph Scrambler news
Dashavatar Collection: दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' हाऊसफुल, रविवारी सर्व रेकॉर्ड मोडले

नवीन बाईकसोबतचा हा आनंदाचा क्षण निखिलने चाहत्यांशी शेअर केला आणि लगेचच त्याच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मराठी कलाकार प्रथमेश शिवलकर, सौरभ चौघुले, नम्रता संभेराव यांसारख्या सहकलाकारांनी त्याचं भरभरून कौतुक केलं. चाहत्यांनीसुद्धा कमेंट्स करून अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे निखिलला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणावर असून तो सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. अलीकडेच गणपतीनिमित्त तो चिपळूण गावी गेला होता. त्याने शेअर केलेल्या कोकणातील गणेशोत्सवाच्या व्हिडीओलाही चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता त्याच्या आयुष्यात आलेल्या या नवीन गाडीमुळे निखिलचं सर्वत्र कौतुक होत आहे. चाहत्यांनीही त्याच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Nikhil Bane new bike Triumph Scrambler news
Monday Horoscope : या राशीच्या व्यक्तीला महत्वाच्या कामात अडथळे, वाचा सोमवारचे राशीभविष्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com