Monday Horoscope : या राशीच्या व्यक्तीला महत्वाच्या कामात अडथळे, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

धावपळ, दगदग आज दिवसभरात वाढणार आहे. मात्र काहीतरी वेगळा पराक्रम आज कराल.

मेष राशी | saam

वृषभ

धनयोग उत्तम आहेत. वारसा हक्काच्या प्रॉपर्टीशी निगडित काही व्यवहार किंवा बैठका असतील तर आज त्या पार पडतील.

वृषभ | Saam Tv

मिथुन

वक्तृत्व उत्तम असणारी आपली रास आहे. बोलण्यामधून समोरच्याचे मन जिंकाल. धडपड करावी लागेल. कर्क

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

मनस्ताप वाढवणाऱ्या घटना घडतील. न केलेल्या गोष्टींचे खापर आपल्यावर येईल. सोप्या गोष्टी अवघड होऊन बसतील.

कर्क राशी | saam

सिंह

मैत्री मधून लाभ संभावत आहेत. जुनी येणी वसूल होतील. धडपड करून मिळालेले यश हे कायमस्वरूपी असते हे जाणवेल.

सिंह राशी | saam

कन्या

करियर फोफावेल. समाजकारणामध्ये हिरीरिने सहभाग घ्याल. हिशोबाशी निगडित काही गोष्टी असतील तर असत्या मार्गी लागतील.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तुळ

देवी उपासना फलदायी ठरेल. तीर्थक्षेत्री भेटी होतील. भाग्यकारक घटना आणि सुवार्ता कानी येणार आहेत.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

गुप्तधनाची आस वाढेल. कदाचित त्यासाठी विशेष प्रयत्न कराल. काहीतरी गोष्टीचे गूढ शोधण्यासाठी आज प्रयास असेल.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

व्यवसायामध्ये अनेक टप्पे आज चांगले येतील. आणि ते सहज पारही होतील. सद्गुरूंची विशेष कृपा आपल्यावर राहणार आहे.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

जुने, चिकट रोग- आजार आज डोके वर काढतील. कामात येणाऱ्या अडचणी बोलून सोडवल्यानंतर सहज मार्ग निघेल.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

संशोधनात्मक वृत्ती वाढीस लागेल. नव्याने काहीतरी शिकण्यासाठी धडपड करायला विद्यार्थ्यांना दिवस उत्तम आहे.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

घरी एखादे धार्मिक कार्य होईल. मातृसौख्य, वाहनसौख्य, गृहसौख्य यासाठी दिवस उत्तम आहे.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT : Fitness Diet: ओमलेट की उकडलेले अंडे? वजन कमी करण्यासाठी योग्य पर्याय कोणता?

Boiled Egg vs Omelette for Weight Loss | google
येथे क्लिक करा