Bhediya: डोळ्यात 'ती' थरारकता आणि हातात इंजेक्शन; 'भेडिया' चित्रपटातील क्रितीचा जबरदस्त लूक चर्चेत

क्रिती चित्रपटात डॉक्टरचे पात्र साकारत आहे. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये तिच्या डोळ्यातील तिक्ष्ण दहशत आणि हातात इंजेक्शन दिसून येत आहे.
Bhediya Movie Latest Post
Bhediya Movie Latest Post Instagram/ @kritisanon
Published On: 

मुंबई: अमर कौशिक दिग्दर्शित 'भेडिया' सिनेमाची चर्चा प्रदर्शनाआधीच होत आहे (Bollywood Film). चित्रपटात हॉरर आणि कॉमेडी हे दोन्हीही जॉनर दिसत आहेत. सध्या या चित्रपटाची मनोरंजन क्षेत्रापासून इतर क्षेत्रात ही चांगलीच चर्चा होत आहे (Bollywood New Movie Release). चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये खूपच उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते त्यात वरुण एका खतरनाक लूकमध्ये दिसून आला होता. आता या चित्रपटाचा नवा लूकही समोर आला आहे. त्यात क्रितीचा खूपच वेगळा लूक दिसून येत आहे. (Bollywood Actor) (Bollywood Actress)

Bhediya Movie Latest Post
Vaishali Takkar Suicide: वैशाली ठक्करने का उचललं टोकाचे पाऊल? धक्कादायक कारणे आली समोर

क्रिती आणि वरुण या दोघांनीही हा चित्रपटाचा पोस्टर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. क्रिती चित्रपटात डॉक्टरचे पात्र साकारत आहे. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये तिच्या डोळ्यातील तिक्ष्ण दहशत आणि हातात इंजेक्शन दिसून येत आहे. चित्रपटातील क्रितीचा फर्स्ट लूक शेअर करताना क्रितीने कॅप्शनमध्ये लिहीले की, 'अनिका डॉक्टरला भेटा, भेडियाची डॉक्टर, कृपया मनुष्याने डॉक्टरकडे सांभाळून या.' सोबतच चित्रपटाचा ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार आहे. क्रिती सेनॉनचा हा लूक चाहत्यांना खूप आवडतोय. या पोस्टरवरही अनेक कमेंट येत आहेत. (Social Media)

दिग्दर्शक अमर कौशिक दिग्दर्शित भेडिया हा चित्रपट २५ नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. चित्रपट 3D आणि 2D मध्ये प्रदर्शित होणार आहे. क्रिती आणि वरुणचा हा दुसरा चित्रपट असेल. यापूर्वी दोघेही ‘दिलवाले’ चित्रपटात एकत्र दिसले होते. स्त्री आणि बाला यांसारख्या यशस्वी चित्रपटानंतर दिग्दर्शक अमर कौशिक हा तिसरा चित्रपट बनवत आहे. नुकतेच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे पोस्टर आणि भव्य दृश्यांमुळे चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.